
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti | वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई, जि.बीड या बँकेत विविध पदाच्या जागा भरण्यासाठी दिनांक 31/05/2024 रोजी दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगर या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10/06/2024 पुर्वी अर्ज मेलद्वारे पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti पदांचा तपशिल
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
2. | शाखाधिकारी | 03 |
3. | IT Manager /संगणक सहायक | 01 |
4. | लिपिक | 05 |
एकूण | 10 |
वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे बँकेमध्ये एकुण 10 जागा भरण्यात येणार आहे. सदर भरती कंत्राटी पध्दतीची असून पर्मनंट नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्यास सुरुवात | 31/05/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 10/06/2024 |
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti शैक्षणिक पात्रता व अनुभव
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
1. | मुख्य कार्यकारी अधिकारी | 1.M COM / MBA FINANCE 2. सीएआयआयबी सर्टीफाईड असोसियत ऑफ फायनान्स/डी.सी. बी. डिप्लोमा इन को.ऑप बिझीनेस मॅनेजमेंट किंवा तत्सम किंवा 3. चार्टड / कॉस्ट अकौंटंट 4. संगणक ज्ञान आवश्यक 5. उमेदवाराचे वय 40 ते 60 वर्षे असावे. | मुख्य कार्यकारी अधिकारी / उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ सरव्यवस्थापक / सहाय्यक सरव्यवस्थापक पदाचा व मुख्यालयातील विविध विभागातील कामकाजाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
2. | शाखाधिकारी | 1.बी. कॉम / एम कॉम किंवा 3 बी.एससी / एम एससी/ MBA/ FINANCE 2. सहकारी पदविका असावी 3. संगणक ज्ञान आवश्यक 4. उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्ष असावे. | सहकारी बँकेत शाखाधिकारी म्हणून किमान 05 वर्षाचा किंवा अधिकारी पदा स्तरावरील बँकिंग कामकाजाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक व बँकेतील क्रेडीट अप्रेजल व मानिटरींग/बिझिनेस डेव्हलपमेंट / ऑडीट / कर्ज वसुली बाबत विशेष अनुभव असल्यास प्राधान्य |
3. | IT Manager/संगणक सहायक | 1. बी.एस.सी./एम.एस.सी. कॉम्प्युटर / B.E. Computer / |BCA/MCA किंवा तत्सम विषयाचा पदवीधर असावा 2. उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्ष असावे. | बँकिंग क्षेत्रातील आय.टी. विभागातील किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
4. | लिपिक | 1. बी.कॉम / एम.कॉम 2. सहकारी पदविका असावी 3. संगणक ज्ञान आवश्यक 4. उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्ष असावे | बँकिंग क्षेत्रातील लिपिक पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti वयोमर्यादा
वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई येथे विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी – 40 ते 50 वर्षे, शाखाधिकारी – 30 ते 35 वर्षे, IT Manager/संगणक सहायक – 25 ते 40 वर्षे, लिपिक – 25 ते 35 वर्षे असावे.
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti निवड प्रक्रिया
वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई येथे विविध पदासाठी जाहिर झालेल्या भरतीसाठी उमेदवारांना ई-मेलद्वारे बायोडाटा, शैक्षणिक माहिती, अनुभव आदी पाठवावा लागणार असून नेमणुकीबाबत अंतिम निर्णय संचालक मंडळाने त्यांच्याकडे ठेवला आहे.
Vasundhara Mahila Nagari Sahakari Bank Bharti अर्ज कसा करावा?
पात्र, इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी मा.अध्यक्षा यांचे नावे वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई, मोंढा रोड, हौसिंग सोसायटी, अंबाजोगाई, जिल्हा बीड – 431517 या पत्त्यावर बायोडाटा तसेच शैक्षणिक व अनुभव कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह अर्ज दिनांक 10/06/2024 रोजी पर्यंत पोस्टाने अथवा ho@vasundharabank.in ईमेलद्वारे मुख्य कार्यालयात पोहचतील असे पाठवावे.