
UIIC Bharti 2024 : पुर्णपणे भारत सरकारची मालकी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये Administrative Officer पदाच्या एकुण 200 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जे उमेदवार Banking आणि Insurance क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पदवी प्राप्त इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून शेवट दिनांक 05 नोव्हेंबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
UIIC Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
पदाचे नाव | Administrative Officer |
एकूण पदसंख्या | 200 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 15/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 05/11/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://uiic.co.in |
UIIC Bharti 2024 Vacancy
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (Scale-I) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट] संवर्गातील विविध पदाच्या 200 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (Scale-I) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट] | 200 |
Total | 200 |
UIIC Bharti 2024 Eligibility Criteria
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (Scale-I) [Specialist/Generalist] | B.E./B.Tech./M.E./M.Tech +PG/PGDM (Risk Management) 60% Marks / CA किंवा B.Com./M.Com./LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी आवश्यक |
Fees
ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर SC/ST/ExSM/महिला उमेदवारांना रु.250/- शुल्क भरावे लागेल.
Age Limit
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 30/09/2024 रोजी 21 ते 30 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Important Dates : ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 15/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 05/11/2024 असणार आहे.
Selection process : जाहिराती दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड Administrative Officer व Generalist पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची Objective Type Question वर आधारीत परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये Reasoning 25 गुण, English Language 40 गुण, Quantitative Aptitude 25 गुण, General Awareness 20 गुण, Computer Knowledge 20 गुण, An Additional test to assess technical & professional knowledge in relevant discipline 120 गुण असे एकुण 250 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तम गुणांची पास होतील अशा उमेदवारांची मुलाखत होईल व त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणी नंतर निवड करण्यात येईल.
How to Apply : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/uiiclsep24/ ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
हे पण वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1067 जागा, थेट मुलाखतीमधून निवड
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |