Tata Memorial Hospital Vacancy | टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या आस्थापनेवर Non-Medical पदाच्या विविध जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. मुंबई येथील देशातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पीटल असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पीटल येथे विविध पदांच्या एकूण 28 जागा भरावयाच्या असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करावयाचा असून शेवट दिनांक 07/05/2024 आहे.
Tata Memorial Hospital Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मेडीकल फिजिसिस्ट | 01 |
2 | लोअर डिव्हीजनल क्लर्क | 03 |
3 | स्टेनोग्राफर | 01 |
4 | महिला नर्स `ए’ | 22 |
5. | टेक्निशियन `सी’ | 01 |
Total | 28 |
Tata Memorial Hospital Vacancy Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 17/04/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 07/05/2024 |
Tata Memorial Hospital Vacancy Eligibility
Educational Qualification
विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून काही पदावर अर्ज करण्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे. सविस्तर माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव |
मेडीकल फिजिसिस्ट | M.Sc. Physics व Diploma in Radiological Physics व 1 वर्षाचा अनुभव |
लोअर डिव्हीजनल क्लर्क | कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT व 1 वर्षाचा अनुभव |
स्टेनोग्राफर | कोणत्याही शाखेची पदवी, Shorthand 80 श.प्र.मि., Typing 40 श.प्र.मि., 3 महिण्याचा कॉम्प्युटर कोर्स व अनुभव आवश्यक |
महिला नर्स `ए’ | GNM व Oncology Diploma किंवा B.Sc. नर्सिंग व 1 वर्षाचा अनुभव. |
टेक्निशियन `सी’ | 12वी Science व 1 किंवा 6 महिण्याचा ICU/OT Assistant Diploma व 3 वर्षाचा अनुभव. |
Age Limit
टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे जाहिर झालेल्या विविध पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Exam Fees
टाटा मेमोरियल हॉस्पीटल येथे विविध पदावर अर्ज करण्यासाठी रु.300/- ऑनलाईन शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/महिला /दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना शुल्क लागू नाही.
हे पण वाचा : NVS Bharti 2024 – नवोदय विद्यालय Non-Teaching Staff महाभरती, 1377 जागा
Tata Memorial Hospital Vacancy Selection Process
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार अर्ज करणार्या उमेदवारांची लेखी परिक्षा, मुलाखत व स्कील टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता व कागदपत्रांआधारे निवड करण्यात येईल. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
How to apply tata memorial hospital vacancy online
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://tmc.gov.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन करिअर ऑप्शनवर क्लिक करुन संबंधित जाहिरातीमध्ये जावे. तेथे जाऊन प्राथमिक माहिती भरुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आयडी व पासवर्ड जनरेट झाल्यावर अर्जामधील संपूर्ण माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावे. शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट भरुन प्रिंटआऊट करुन ठेवावे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |