ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 256 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
ST Mahamandal Bharti 2024
ST Mahamandal Bharti 2024

ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या धुळे जिल्हा यांच्या आस्थापनेवर विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण 256 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी इयत्ता 10 वी पास व संबंधित ट्रेडमधील आयटीआय पास पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करावयाचा असून दिनांक 06/06/2024 पुर्वी अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.

Vacancy Details

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या आस्थापनेवर भरण्यात येत असलेल्या शिकाऊ पदाच्या एकुण 256 जागा 1 वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यासाठी पदानुसार जागा दर्शविल्या आहेत.

पदाचे नावपदसंख्या
इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक व्हेईकल)65
इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक)64
पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल फिटर)28
सांधाता (वेल्डर)15
इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री)80
कातारी (टर्नर)2
अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.)2
Total256

ST Mahamandal Bharti 2024 Eligibility

ST Mahamandal Dhule येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे पात्रता असावी.

  1. उमेदवार इ.10 वी (SSC) पास असावा.
  2. संबंधित विषयातील आयटीआय कोर्स पास

ST Mahamandal Bharti 2024 Age Limit

कार्यशाळेकडील व्यवसाय म्हणजेच पद क्र.1 ते 6 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 22/05/2024 रोजी 16 ते 33 वर्ष असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सुट आहे.

ST Mahamandal Bharti 2024 Fee

ह्या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. अमागास / खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- तर मागासवर्गीय उमेदवारांना रु.250/- रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे शुल्क भरावे लागेल.

ST Mahamandal Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक22/05/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक06/06/2024

ST Mahamandal Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार उमेदवारांनी अलिकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिकटवून सही करुन ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/06/2024 असुन उमेदवारांनी त्याआधी अर्ज पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवावा.

Read Also | Indian Army Rally Bharti 2024 : भारतीय सैन्य रॅली आयोजित 57 जागांवर भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे

Leave a Comment