Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेत लिपिक, शिपाई व इतर शिक्षक व शिक्षकेतर पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Bharti

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कुल सांगली या संस्थेत शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीमध्ये मुख्याध्यापक, सुपरवायझर, सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, चित्रकला शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, दायी या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात माझी नोकरी (Majhi Naukri) मिळावी अशी आशा बाळगणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लेखामध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Vacancy

रयत शिक्षण संस्था या संस्थेत विविध पदाच्या एकुण 35 जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कर्मचारी भरण्यात येणार आहेत. सदर भरती ही कंत्राटी पध्दतीची असून शाळा ही पुर्णपणे Non-Grant आहे. पदनिहाय सामाजिक आरक्षण यासाठीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Educational Qualification

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे दर्शविली आहे.

अ. क्र.विभागपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.Primary & Secondary 1st to 10thHead MasterM.A., M.Sc. B.Ed., with Experience English Medium School.
SupervisorM.A., M.Sc. B.Ed., with Experience English Medium School.
Asst. TeacherHSC, D.Ed./B.A.(Eng.) /B.Sc., B.Ed.
Physical TeacherB.P.Ed.
Computer TeacherBCS/BCA/B.Sc. (Comp.)
DrawingATD/AM
LibrarianB.Lib Sc/LTC
2.Primary & Secondary 1st to 10thClerkB.Com/M.Com. MS-CIT & Tally
PeonHSC (Male Only)
DaiWell Experienced
3.Pre-PrimaryAsst. TeacherM.T.T.C.
DaiWell Experienced
Majhi Naukri मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी हा लेख वाचावा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Age Limit

या शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Fees

रयत शिक्षण संस्था शिपाई भरती यांच्यामार्फत जाहिर झालेल्या या भरतीसाठी जाहिरातीमध्ये कोणत्याही शुल्काविषयी माहिती दिलेली नाही.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Interview

रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या आस्थापनेवरील कर्मवीर भाऊराव पाटील पब्लीक स्कुल सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2024-2025 वर्षासाठी कंत्राटी तत्वावर होत असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीची वेळ व दिनांक कळविण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 01/06/2024 वार शनिवार पर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा. मुलाखतीस जातांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन जाणे. जाहिरातीमधील माहितीनुसार मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ते दिले जाणार नाही.

Rayat Shikshan Sanstha Address

Apply to Inspector, Rayat Shikshan Sanstha’s, Southern Region, Sangli at Karmaveer Bhaurao Patil Public School, Abhinandan Colony, Shinde Mala, Sangli.

वरील दिलेली संपूर्ण माहिती दिलेल्या जाहिरातीप्रमाणे येथे दिली आहे. तरी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

Leave a Comment