
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक (गट-क) या पदांवर भरती करण्यात येणार आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतील अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून शेवट पात्रतेनुसार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Overview :
विभागाचे नाव | समाज कल्याण विभाग पुणे |
पदाचे नाव | वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक (गट-क) |
एकूण पदसंख्या | 219 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 10/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 11/11/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Vacancy:
समाजकल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत वर्ग-3 संवर्गातील विविध पदाच्या 219 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
2. | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
3. | गृहपाल / अधिक्षक – महिला | 92 |
4. | गृहपाल / अधिक्षक – सर्वसाधारण | 61 |
5. | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
6. | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
7. | लघुटंकलेखक | 09 |
एकूण | 219 |
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria :
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | गृहपाल अधिक्षक – महिला / गृहपाल अधिक्षक – सर्वसाधारण | कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT उत्तीर्ण |
2. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT उत्तीर्ण |
3. | समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT उत्तीर्ण |
4. | उच्चश्रेणी लघुलेखक | इ.10 वी पास, मराठी व इंग्रजी लघुलेखन प्रमाणपत्र 120 प्र.श.मि., टंकलेखन मराठी 30 शप्रमि व इंग्रजी 40 शप्रमि, तसेच MS-CIT उत्तीर्ण |
5. | निम्नश्रेणी लघुलेखक | इ.10 वी पास, मराठी व इंग्रजी लघुलेखन प्रमाणपत्र 100 प्र.श.मि., टंकलेखन मराठी 30 शप्रमि व इंग्रजी 40 शप्रमि, तसेच MS-CIT उत्तीर्ण |
6. | लघुटंकलेखक | इ.10 वी पास, मराठी व इंग्रजी लघुलेखन प्रमाणपत्र 80 प्र.श.मि., टंकलेखन मराठी 30 शप्रमि व इंग्रजी 40 शप्रमि, तसेच MS-CIT उत्तीर्ण |
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Fees :
ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.900/- शुल्क भरावे लागेल. माजी सैनिक उमेदवारांना शुल्क लागू नाही.
Pune Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Age Limit :
पुणे येथील समाज कल्याण विभागामध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 31/10/2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Important Dates :
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 10/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 11/11/2024 असणार आहे.
Selection Process :
जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
How to Apply :
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://cdn.digialm.com/ ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
हे पण वाचा : Chandrapur DCC Bank Bharti 2024 – लिपिक व शिपाई पदाच्या एकुण 358 पदांची भरती
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |