PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक / फायमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्यासाठीची जाहिरात दिनांक 16/03/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून फायरमन (अग्निशामक) पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 150 पदांची भरती करण्यात येणार येत आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दिनांक 26/04/2024 पासून ते शेवट दिनांक 17/05/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
PCMC Fireman Bharti 2024 Vacancy Details
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे भरण्यात येत असलेल्या अग्निशामक 150 पदाची प्रवर्गनिहाय संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
जात प्रवर्ग | पदसंख्या |
SC | 20 |
ST | 10 |
VJ (A) | 04 |
NT (B) | 04 |
NT (C) | 04 |
NT (D) | 03 |
SBC | 03 |
OBC | 29 |
EWS | 15 |
ESBC | 15 |
Open | 43 |
Total | 150 |
PCMC Fireman Bharti 2024 Eligibility
अग्निशमन विमोचक / फायमन रेस्क्युअर Fireman पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे पात्रता असावी.
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार इ.10 वी (SSC) पास असावा.
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
- MS-CIT परिक्षा पास प्रमाणपत्र.
शारीरिक पात्रता :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 अग्निशमन विमोचक / फायमर रेस्क्युअर या पदाकरीता ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.
बाब | पुरुष | महिला |
उंची | 165 सें.मी (अनवाणी) | 162 सें.मी. (अनवाणी) |
वजन | 50 किलोग्रॅम | 50 किलोग्रॅम |
छाती | न फुगवता 81 सें.मी. फुगवुन 86 सें.मी. (किमान 5 सें.मी. फुगवणे आवश्यक राहील) | लागू नाही |
दृष्टी | सामान्य (वर्णांधता आजारापासून मुक्त असावा) | सामान्य (वर्णांधता आजारापासून मुक्त असावा) |
ठेवण | उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्टया सदृढ असावा. | उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्टया सदृढ असावा. |
शारीरिक क्षमता मैदानी चाचणी :
पुरुष उमेदवारांसाठी | ||
अ.क्र. | तपशिल | गुण |
अ. | 1600 मी धावणे | 30 |
ब. | जमिनीपासून 33 फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासुन शिडी 20 फुट अंतरावर असेल) | 20 |
क. | 50 कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवुन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मिटर अंतरधावणे | 20 |
ड. | 20 फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरण | 20 |
इ. | पुल-अप्स 20 | 10 |
एकुण गुण | 100 |
महिला उमेदवारांसाठी | ||
अ.क्र. | तपशिल | गुण |
अ. | 800 मी. धावणे | 30 |
ब. | जमिनीपासून 33 फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (46.4 वरील उंचीच्या) अल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासुन शिडी 20 फुट अंतरावर असेल) | 20 |
क. | 40 कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवुन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मिटर अंतरधावणे | 20 |
ड. | गोळा फेक | 10 |
इ. | लांब उडी | 10 |
फ. | पुश अप 10 | 10 |
एकुण गुण | 100 |
Age Limit
दिनांक 17 मे 2024 रोजी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे. (अनाथ उमेदवारास 3 वर्षे सूट). तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे सुट असून माजी सैनिक, भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.
Fee
पिंपरी चिंचवड येथील फायरमन पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. अमागास / खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/- तर मागासवर्गीय उमेदवारांना रु.900/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
PCMC Fireman Bharti 2024 Salary
अग्निशमन विमोचक / फायमर रेस्क्युअर पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना एस-6-19,900-63,200 प्रमाणे वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
PCMC Fireman Bharti online form last date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 16/04/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 17/05/2024 |
PCMC Fireman Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड लेखी परिक्षा, शारीरिक पात्रता / मैदानी चाचणी यामधील गुणांच्या मेरीटआधारे करण्यात येईल.
PCMC fireman bharti online form apply online
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmsindia.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- अर्ज नोंदणी करण्याकरीता “New User Registration” यावर क्विक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in 1d व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
- ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
- आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
- ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |