
OICL Bharti 2024 | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers-Scale-I) पदाच्या रिक्त जागा भरण्यासासाठी एकुण 100 जागांची अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीचा शोध घेत असेलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी हि सुवर्ण संधीच उपलब्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार OICL मध्ये Administrative Officer या पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. दिनांक 21/03/2024 रोजी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 12/04/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
OICL Bharti 2024 Vacancy
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे राबविण्यात येणा-या Administrative Officers (Scale-I) पदाच्या भरतीमध्ये एकूण 100 जागांची भरती करण्यात येणार आहे.
OICL Bharti 2024 Educational Qualification
OICL मध्ये निघालेल्या Administrative Officers या पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/CA/ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/M.E/M.Tech (Information Technology /Computer Science/Electronics & Communication/Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) /MCA/M.B.B.S/BDS/60% गुणांसह LLB पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
OICL Bharti 2024 Age Limit
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी वय 21 ते 30 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट असून SC/ST उमेवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
हे पण वाचा : बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती
OICL Bharti 2024 Fees
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशासकीय अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा फी भरावी लागणार आहे. त्यामध्ये Open, EWS व OBC प्रवर्गासाठी रु.1000/- रुपये फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रु.250/- एवढी फी भरावी लागेल.
Selection Process
जाहिरातीनुसार प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पुर्व व मुख्य अशा दोन लेखी परिक्षा होणार असून मुलाखत व कागदपत्र पडताळणी आणि मेडीकल चाचणी घेऊन मेरीटआधारे निवड करण्यात करण्यात येणार आहे.
OICL Bharti 2024 Important Dates
दिनांक 21/03/2024 रोजी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 12/04/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
IOCL Bharti 2024 Online Apply
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करावा लागणार आहे. उमेवादवारांनी https://orientalinsurance.org.in या वेबसाईटवर “Career” पेजवर भेट देऊन Apply Online बटनावर क्लिक करावे. येथे नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो व सही अपलोड करावे व आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट करुन प्रिंट करुन ठेवावा.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |