NVS Teacher Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती शिक्षक पदावर भरती, एकूण 500 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
NVS Teacher Bharti 2024
NVS PGT and TGT Teacher Bharti 2024

NVS Teacher Bharti 2024 : नवोदय विद्यालय समितीतर्फे PGTs व TGTs पदावर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड व ओरीसा येथे नियुक्त एकुण 500 जागांवर कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यासाठी ही भरती राबविण्यात येत आहे. शिक्षक पात्रता पदवी असणाऱ्या  उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 30/04/2024 पुर्वी अर्ज करावा लागेल.

NVS Teacher Bharti 2024 Vacancy

Navoday Vidyalaya Samiti तर्फे आयोजित केलेल्या PGTs व TGTs शिक्षक भरतीसाठी एकूण 500 पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विषय व राज्यानुसार शिक्षकांच्या पदांची संख्या ही वेगवेगळी आहे.

NVS Teacher Bharti 2024 Education Qualification

  • PGTs शिक्षक पदावर विषयानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्षाचा शिक्षक डिप्लोमा व 50टक्क्यासह पदव्युत्तर पदवी पास असावा.  तसेच शिकवणीचा अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
  • PGT Computer Science शिक्षक पदावर विषयानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. Computer Science / IT / MCA उत्तीर्ण असावा. तसेच B.Ed. पदवी असणे आवश्यक आहे. शिकवणीचा अनुभव व संगणक ज्ञान  तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
  • TGTs पदावर अर्ज करणारे उमेदवर चार वर्षाचा Integrated Degree कोर्स पास असावे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा. CTET, B.Ed. Degree पदवी असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी).

NVS Teacher Bharti 2024 Age Limit

नवोदय विद्यालय समितीमध्ये PGTs व TGTs शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारासांठी 1 जुलै 2024 रोजी वय 50 वर्षपर्यंत असावे. तसेच माजी NVS शिक्षक असल्यास 65 वर्षापर्यंत असावे.

NVS Teacher Bharti 2024 Fee

नवोदय विद्यालय समिती तर्फे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिरातीमध्ये शुल्क भरण्याबाबत उल्लेख नाही.

NVS Teacher Bharti 2024 Salary

नवोदय विद्यालय समितीमध्ये निवड होणाऱ्या PGTs साठी दरमहा एकत्रित (Normal Station) रु.35,750/- व (Hard Station) रु.42,250/- आणि TGTs पदासाठी दरमहा (Normal Station) रु.34,125/- व (Hard Station) रु.40,625/- वेतन मिळेल. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Read Also : शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर पदांवर भरती, थेट मुलाखतीमधून निवड

NVS Teacher Bharti 2024 Date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक16/04/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक26/04/2024

Application Process

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाहिरातीमध्ये PGTs व TGTs साठी दोन वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत.
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
  • पात्रतेनुसार त्या लिंकवर जाऊन विचारलेली संपूर्ण माहिती भरावी.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment