NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय Non-Teaching Staff महाभरती, 1377 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
NVS Bharti 2024
NVS Non-Teaching Bharti 2024

NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय समितीतर्फे Non-Teaching Staff मध्ये Group B व Group C पदाच्या विविध जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकुण 1377 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी इ.10 वी पास असणाऱ्या उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही उत्तम संधी प्राप्त झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 14/05/2024 पुर्वी अर्ज करावा लागेल.

NVS Bharti 2024 Vacancy

Navoday Vidyalaya Samiti तर्फे आयोजित केलेल्या विविध पदांवर होत असलेल्या भरतीप्रक्रियेमध्ये खालील पदांवर भरती होणार आहे. 1377 Non-Teaching पदाचे नाव व पदांची संख्या खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नावपद संख्या
स्टाफ नर्स (महिला) Group B121
असिस्टंट सेक्शन ऑफिसर Group B05
ऑडिट असिस्टंट  Group B12
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर Group B04
लीगल असिस्टंट Group B01
स्टेनोग्राफर Group B23
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)21
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
लॅब अटेंडंट (Group-C)161
मेस हेल्पर (Group-C)442
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19
Total1377
NVS Non Teaching Staff Group B and Group C Recruitment 2024 Table

NVS Bharti 2024 Education Qualification

NVS Bharti 2024 मार्फत होत असलेल्या या Non-Teaching Staff भरती होण्यासाठी विविध पदानुसार उमेदवारांकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादीची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला)B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) व 02 वर्षे अनुभव.
असिस्टंट सेक्शन ऑफिसरपदवीधर व 03 वर्षे अनुभव
ऑडिट असिस्टंट B.Com पदवी
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसरइंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
लीगल असिस्टंटLLB व 03 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर12वी उत्तीर्ण, डिक्टेशन – 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण – संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)10वी उत्तीर्ण, ITI (Electrician/Wireman) आणि 02 वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट (Group-C)10वी उत्तीर्ण, लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
मेस हेल्पर (Group-C)10वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)10वी उत्तीर्ण
NVS Non Teaching Bharti 2024 Educational Details Table

NVS Bharti 2024 Age Limit

नवोदय विद्यालय समितीमध्ये जाहिर झालेल्या NVS Bharti 2024 भरतीसाठी विविध पदानुसार वयाची पात्रता वेगवेगळी आहे. दिनांक 14/05/2024 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे असावे. तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पदाचे नाववयोमर्यादा
स्टाफ नर्स (महिला)35 वर्षे
असिस्टंट सेक्शन ऑफिसर23 ते 33 वर्षे
ऑडिट असिस्टंट 18 ते 30 वर्षे
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर32 वर्षे
लीगल असिस्टंट23 ते 35 वर्षे
स्टेनोग्राफर18 ते 27 वर्षे
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)18 ते 30 वर्षे
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)35 वर्षे
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)18 ते 27 वर्षे
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)18 ते 27 वर्षे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)35 वर्षे
लॅब अटेंडंट (Group-C)18 ते 30 वर्षे
मेस हेल्पर (Group-C)18 ते 30 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)18 ते 30 वर्षे
Age Criteria Description Table

Fee Details

नवोदय विद्यालय समिती भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ते सुध्दा पदानुसार व प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

स्टाफ नर्स (महिला) :

Open/OBC – रु.1500/- शुल्क

SC/ST/PWD – रु.500/- शुल्क

इतर पदांसाठी :

Open/OBC – रु.1000/- शुल्क

SC/ST/PWD – रु.500/- शुल्क

Salary

नवोदय विद्यालय समिती भरतीसाठी अर्ज करुन निवड होणाऱ्यांसाठी पदानुसार वेगवेगळा पे-मेट्रीक्स आहे. कमीत-कमी रु.18,000/- ते रु.1,42,400/- पर्यंत वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Important date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक22 March 2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक14 May 2024

NVS Bharti 2024 Selection Process

अर्ज करण्याऱ्या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आवश्यक असलेल्या पदासाठी Skill Test/Typing Test/ Typewriting Test घेण्यात येईल. त्यानंतर Document Verification व Medical Examination होऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल.

Read Also : SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे 3712 पदांची बंपर भरती, 12वी पास, लगेच करा अर्ज

NVS Bharti 2024 Application Process

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://nvs.ntaonline.in/ या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यावर बुलेटीनमधील माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
  • युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment