NLC Bharti 2024 | NLC इंडिया लिमिटेड मध्ये 239 जागांवर भरती, असा करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
NLC Bharti 2024

NLC Bharti 2024 : NLC INDIA LIMITED मध्ये MSE & Technical TraineeMain Support Services पदाच्या एकुण 239 जागा भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रशिक्षणार्थी म्हणून तीन वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍या बेरोजगार अभियंत्यांना चांगली संधी चालून आली आहे. सदर भरती Neyveli Lignite Corporation Indian Limited तर्फे राबविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांक 19/04/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

NLC Bharti 2024 एकुण पदांचा तपशिल

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1MSE & Technical100
2Main Support Services139
 Total239
NLC Bharti 2024 vacancy detail table

NLC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

MSE & Technical Trainee – संपूर्ण वेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 3 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम (बारावी पात्रता असलेले डिप्लोमा लॅटरल उमेदवार किमान दोन वर्षांचा कालावधी)*

Main Support Services Trainee – कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण (किंवा) 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात.

NLC Bharti 2024 वयोमर्यादा

Trainee पदाचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 37 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

NLC Bharti 2024 परिक्षा शुल्क

ही भरती प्रक्रिया पुर्णत: निशुल्क असून कोणत्याच प्रकारचे अर्ज शुल्क उमेदवारांना भरण्याची आवश्यकता नाही.

वेतन / पगार

ह्या भरतीमध्ये निवड होणार्‍या उमेदवारांना 14,000/- ते 22,000/- पर्यंत दरमहा वेतन मिळेल.

Read Also : नाशिक येथे अप्रेंटिस पदाच्या जागा, इंजिनिअर असाल करा अर्ज

निवड प्रक्रिया

ह्या भरतीकरीता MSE & Technical व Main Support Services पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास होणार्‍या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी व नंतर वैद्यकीय चाचणी होऊन मेरीटआधारे निवड करण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

Nlc bharti 2024 apply online

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.nlcindia.in/new_website/index.htm या वेबसाईट करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावा.
  • अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment