
NGEL Bharti 2024 : केंद्र सरकारच्या NTPC Green Energy Limited मध्ये Engineer व Executive पदाच्या जागा भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकुण 63 जागांवर भरती होणार असून सदर भरती ही तीन वर्षाच्या कंत्राटी करार तत्वावर होणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेत असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 21/03/2024 पासून ते शेवट दिनांक 13 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात.
NGEL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
ही भरती इंजिनियर व एक्झिक्युटिव पदाच्या एकुण 63 जागा भरण्यासाठी होत असुन अर्ज करण्यासाठी पदानुसार वेगवेगळी पात्रता आहे. तसेच सदर पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवांकडे इंजिनिअरींग पदवी व अनुभव असणे सुध्दा आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक व अनुभव माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरुन काळजीपूर्वक जाहिरात वाचावी.
NGEL Bharti 2024 वयोमर्यादा
इंजिनियर व एक्झिक्युटिव पदावर अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी 30/32 वर्षे असावे. तसेच इतर मागासर्वीय OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे वयात सूट असून SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर पदाच्या एकुण 968 जागा
NGEL Bharti 2024 अर्ज शुल्क
सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या Open/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.500/- फी ठेवण्यात आली असून SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी लागू नाही.
एनईजीएल भरती 2024 वेतन
ही भरती प्रक्रिया कंत्राटी असून तीन वर्षाच्या करारावर असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 83,000/- वेतन दिले जाणार आहे.
एनईजीएल भरती 2024 निवड प्रक्रिया
सदर जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची दोन टप्प्यात परिक्षा होणार असून यामध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
एनईजीएल भरती 2024 अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी www.ngel.in या लिंकवर भेट देऊन नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व अंगठा स्कॅन करुन अपलोड करावे व आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट करुन प्रिंट करुन ठेवावा.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |