
NCB Bharti 2024 | केंद्र सरकारच्या गृह खात्याअंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये स्टाफ कार ड्रायवर (Grade-I & Grade-II) पदाच्या 31 जागा भरण्यासाठीची अधिसूचना फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार रिक्त पदांवर भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 02 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 अशी आहे.
NCB Bharti 2024 Vacancy Details
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये स्टाफ कार ड्रायवर पदाच्या एकुण 31 जागा भरण्यात येत आहेत.
NCB Bharti 2024 Educational Qualification
जे उमेदवार सध्या केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत आहेत असे उमेदवार या पदावर अर्ज करण्यासाठी पात्र असेल. तशी माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.
NCB Bharti 2024 Age Limit
स्टाफ ड्रायवर पदावर अर्ज करणा-या उमेदवाराचे वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
Fees
स्टाफ ड्रायवर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू नाही.
Selection Process
आफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झाल्यास देशभरात कोठेही नोकरी करावी लागणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेवाराला स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे.
NCB Bharti 2024 Salary
स्टाफ कार ड्रायवर (Grade I) या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना रु.5200-20200 + GP 2800
स्टाफ कार ड्रायवर (Grade II) या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना रु.5200-20200 + GP 2400
Read also : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 पदांची बंपर भरती, असा करा अर्ज
How to Apply NCB Bharti
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा खाली दिलेली पीडीएफ फाईलमधून अर्ज नमुण्याची प्रिंट करुन घ्यावी व कागदापत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह Deputy Director (Admn.), Narcotics Control Bureau, 2nd Floor, August Kanti Bhawan, Bhikaji Cama Place, New Delhi 110066 ह्या पत्त्यावर पाठवावे.