Naval Dockyard Mumbai Bharti 2024 |नॉवल डॉकयार्ड मुंबई येथे 301 जागांवर भरती, 8वी, 10वी पास असणाऱ्यांनी करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Naval Dockyard Mumbai Bharti
Naval Dockyard Mumbai Bharti

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | नॉवल डॉकयार्ड मुंबई येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या एकुण 301 जागांवर भरतीसाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इ.8 वी, 10 वी पास व आयटीआय पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. सदर प्रशिक्षण कालावधी 1 व 2 वर्षाचा असून नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. दिनांक 23/04/2024 पासून ते दिनांक 10/05/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

Naval Dockyard Mumbai Vacancy

ट्रेडपद संख्या
इलेक्ट्रिशियन40
इलेक्ट्रोप्लेटर01
फिटर50
फाउंड्रीमन01
मेकॅनिक (Diesel)35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
मशीनिस्ट13
MMTM13
पेंटर (G)09
पॅटर्न मेकर02
पाईप फिटर13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
मेकॅनिक Reff. AC07
शीट मेटल वर्कर03
शिपराईट (Wood)18
टेलर (G)03
वेल्डर (G & E)20
मेसन (BC)08
I & CTSM03
शिपराईट (Steel)16
रिगर12
फोर्जर & हीट ट्रीटर01
Total301
Naval Dockyard Apprenticeship

वरील तक्त्यातील रिगरफोर्जर अ‍ॅण्ड हिट ट्रिटर या पदांसाठी दोन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी आहे. तसेच इतर पदांसाठी एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात23/04/224
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक10/05/2024
अंदाजित परीक्षा दिनांकमे – जून 2024

Naval Dockyard Mumbai Bharti Eligibility

Educational Qualification

वरील पदांपैकी रिगर या पदावर अर्ज करण्यासाठी उमदेवार किमान 8 वी उत्तीर्ण असावा. तसेच फोर्जर अ‍ॅण्ड हिट ट्रिटर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा आणि उर्वरित पदांसाठी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT) असणे आवश्यक आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti Physical Eligibility

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची उंची 150 सें.मी., छाती फुगवून 05 सेंमी जास्त तर वजन 45 किलो असावे.

Age Limit

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. तसेच SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

Exam Fees

अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

Naval Dockyard Mumbai Bharti Selection Process

नॉवल डॉकयार्ड मुंबई येथे प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल. 100 गुणांची लेखी परिक्षा असून दोन तासाचा वेळ असेल. चुकीच्या प्रश्नांचे गुण वजा केले जाणार नाहीत. परिक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून देता येणार असून परिक्षेचे सेंटर मुंबई असेल. लेखी परिक्षा, ट्रेड व अर्ज संख्येनुसार उमेदवारांची शॉर्टलिस्ट लावण्यात येईल व त्यानुसार मुलाखतीनंतर निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड होणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

Naval Dockyard Mumbai Bharti Online Apply

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://registration.ind.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन शेवट दिनांकाअगोदर अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरुन आवश्यक असणारे संपूर्ण कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सबमीट करावा व अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment