MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी, लिपिक या पदावर ही भरती करण्यात येणार आहे. एकुण 16 जागा भरावयाच्या असून पात्र आणि इच्छुक पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करावयाचा असून शेवट दिनांक 14/05/2024 पुर्वी अर्ज करावा.
MUCBF Bharti 2024 Vacancy
बँकेमार्फत आयोजित केलेल्या भरतीसाठी उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. एकुण 16 जागांवर भरती करण्यात येणार असून जागांचा तपशिल खालीलप्रमाणे –
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 |
लेखापाल | 01 |
शाखाधिकारी | 02 |
अधिकारी | 02 |
लिपिक | 10 |
एकूण | 16 |
MUCBF Bharti 2024 Education Qualification
बँके अंतर्गत विविध पदावर होत असलेल्या भरतीसाठी उमेदवाराकडे पदानुसार खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य आणि 05 वर्षे अनुभव |
लेखापाल | पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य आणि 03 वर्षे अनुभव |
शाखाधिकारी | पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य आणि 05 वर्षे अनुभव |
अधिकारी | पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य आणि 03 वर्षे अनुभव |
लिपिक | पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य |
MUCBF Bharti 2024 Age Limit
विविध पदावर अर्ज करण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय पदानुसार खालील तक्त्यामध्ये दर्शविले आहे.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
प्रशासकीय अधिकारी | 30 वर्षे |
लेखापाल | 25 वर्षे |
शाखाधिकारी | 30 वर्षे |
अधिकारी | 25 वर्षे |
लिपिक | 22 ते 35 वर्षे |
MUCBF Bharti 2024 Fee
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना र्ज शुल्क भरावे लागणार आहे. ते सुध्दा पदानुसार वेगवेगळे आहे.
पद क्रमांक 1 ते 4 साठी रु.590/-
लिपिक साठी रु.944/-
MUCBF Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 30/04/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 14/05/2024 |
MUCBF Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीआधारे होणार आहे.
MUCBF Bharti 2024 Application Process
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.rect-118.mucbf.in/ या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
- मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
- युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, अनुभव इत्यादी माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
- त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |