MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या आस्थापनेवर Trainee Officer व Trainee Associates जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 19/10/2024 पासुन तर दिनांक 08/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

MSC Bank Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई Maharashtra State Co-operative Bank Ltd. |
पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी |
एकूण पदसंख्या | 75 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 19/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 08/11/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.mscbank.com/ |
MSC Bank Bharti 2024 Vacancy | रिक्त पदांचा तपशिल
The Maharashtra State Co-operative Bank Ltd. यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या Trainee Officer व Trainee Associates पदाच्या 75 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
MSC Bank Bharti 2024 Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | Trainee Officer | 25 |
2. | Trainee Associates | 50 |
Total | 75 |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई Trainee Officer पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुण घेऊन उत्तीर्ण व 2 वर्षे कामाचा अनुभव असावा तसेच Trainee Associates पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुण घेऊन उत्तीर्ण असावा. मराठी व इंग्रजी टाईपिंग पास व एमएससीआयटी परीक्षा पास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, अनुभवाची अट नाही.
MSC Bank Bharti 2024 Fees | फि
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे (1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व (2)प्रशिक्षणार्थी सहयोगी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी अनुक्रमे रु.1770/- व 1180/- परीक्षा शुल्क भरावे लागेल.
MSC Bank Bharti 2024 Age Limit | वयोमर्यादा
Maharashtra State Co-operative Bank Limited Vacancy यांच्या आस्थापनेवर (1)प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व (2)प्रशिक्षणार्थी सहयोगी या दोन्ही पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी दिनांक 31/08/2024 रोजी पद क्रमांक 1 साठी उमेदवाराचे वय 23 ते 33 वर्षे असावे. तर पद क्रमांक 2 साठी 21 ते 38 वर्ष असावे.
Important Dates | महत्वाच्या तारखा : ऑनलाईन अर्ज करण्यास दिनांक 19/10/2024 पासून सुरुवात झाली असून दिनांक 08/11/2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ॲडमीट कार्ड परिक्षेच्या 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येईल.
Selection process | निवड पध्दत : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार Maharashtra State Co-operative Bank Limited Vacancy अर्ज करणा-या उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षेतील गुण व मुलाखतीच्या आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
MSC Bank Bharti 2024 salary | वेतन व कामाचे स्वरुप : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा फिक्स 30,000/- एवढे मानधन मिळेल. तसेच Training पुर्ण केल्यानंतर दरमहा रु.49,000/- प्रती महिना पगार दिला जाईल.
Read Also | बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 600 पदांवर मेगा भरती
How to Apply : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/mscblsep24 ह्या Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |