MPSC Civil Services Bharti 2024 : दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आली आहे. एकुण 524 जागा असून राज्यसेवा परिक्षा, महाराष्ट्र वनसेवा परिक्षा व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा तर्फे पदे भरली जाणार आहेत. पदवीधर असलेल्या MPSC ची तयारी करीत असलेल्या व अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबरच आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 09/05/2024 पासून सुरुवात झाली असून शेवट दिनांक 24/05/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
MPSC Civil Services Bharti 2024 Vacancy Details
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षीप्रमाणे 2024 ची संयुक्त राजपत्रित संयुक्त परिक्षेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये एकुण 524 पदांसाठी परीक्षा होणार असून विभागनिहाय पदांची संख्या खालील तक्त्यात दिली आहे.
अ. क्र. | विभाग | संवर्ग | पद संख्या |
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 431 |
2 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | 48 |
3 | मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 45 |
एकुण | 524 |
MPSC Civil Services Bharti 2024 Eligibility
एमपीएससी मार्फत होणाऱ्या संयुक्त राजपत्रित परीक्षा 2024 मध्ये संवर्गनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- राज्यसेवा परीक्षा – उमेदवार पदवीधर असावा किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी धारण केलेली असावी.
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र / वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक.
MPSC Civil Services Bharti 2024 Age Limit
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय, आ.दु.घ./अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.
Exam Fee
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी रु.544/- फी आहे तर मागासवर्गीय, आ.दु.घ./अनाथ उमेदवारांना रु.344/- भरावे लागतील.
MPSC Civil Services Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 09/05/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 24/05/2024 |
MPSC Civil Services Bharti 2024 Selection Process
MPSC मार्फत जाहिर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांची दोन टप्प्यामध्ये परिक्षा होणार आहे. पहिली पुर्व परीक्षा व नंतर मुख्य परीक्षा होईल. या दोन्ही परिक्षामधील गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. मुख्य परिक्षा व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे प्रवर्गनिहाय मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा राज्यसेवा परीक्षा 2024 वेळापत्रक
परीक्षा | दिनांक |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 | 06 जुलै 2024 |
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 | 14 ते 16 डिसेंबर 2024 |
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 | 23 नोव्हेंबर 2024 |
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 | 28 ते 31 डिसेंबर 2024 |
MPSC Civil Services Bharti 2024 Syllabus
MPSC Civil Services Bharti 2024 online form apply online
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- अर्ज नोंदणी करण्याकरीता “Registration” वर Click करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in Id व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
- ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
- आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
- ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |