
Khed Shikshan Prasarak Mandal Bharti | खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु. या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ /अर्धवेळ / तासिक तत्वावर /रजा मुदत /लमसम तत्वावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळावी अशी आशा बाळगणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लेखामध्ये दिलेल्या पत्त्यावर तारखेनुसार हजर राहणे आवश्यक आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.
Khed Shikshan Prasarak Mandal Bharti Vacancy
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय वरिश्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बु. राजगुरुनगर, ता.खेड, जि.पुणे 410505 येथे एकुण 181 पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कर्मचारी भरण्यात येणार आहेत.
- वरिष्ठ विभागात शिक्षक पदाच्या एकुण 92 जागा
- प्रशासकीय विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या 44 जागा
- कनिष्ठ विभागात 34 जागा
- पदव्युत्तर विभागात शिक्षक पदाच्या 11 जागा
अशा एकुण 181 जागांवर ही भरती होणार आहे. वरिष्ठ विभाग / कनिष्ठ / पदव्युत्तर विभागात विषयानुसार शिक्षक पदावर भरती करण्यात येणार आहे. तसेच प्रशासकीय विभाग शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , कार्यालय व ग्रंथालय , संगणक प्रयोगशाळा सहाय्यक , सुरक्षा रक्षक , सेवक / प्रयोगशाळा परिचर , विद्यार्थी ग्राहक भांडारासाठी कनिष्ठ लिपिक , रेक्टर आदी पदावर भरती करण्यात येणार आहे.
Khed Shikshan Prasarak Mandal Bharti Educational Qualification
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे दर्शविली आहे.
- वरिष्ठ विभाग शैक्षणिक पात्रता – M.Sc.,MCS,M.A.,MBA व SET/NET/Ph.D.
- कनिष्ठ विभाग शैक्षणिक पात्रता – M.Com / M.A./ M.Sc. व B.Ed.
- पदव्युत्तर विभाग शैक्षणिक पात्रता – M.A., M.Com, M.Sc व SET / NET/ Ph.D.
- प्रशासकीय विभाग शैक्षणिक पात्रता – 9th Pass, B.Sc., Any Graduate, MSCIT, Marathi-English Typing.
Khed Shikshan Prasarak Mandal Bharti Age Limit
या शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्जकरण्यासाठी उमेदराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
Khed Shikshan Prasarak Mandal Bharti Fees
आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
खेड तालुका शिक्षण मंडळ भरती प्रक्रिया
खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु. या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ /अर्धवेळ / तासिक तत्वावर /रजा मुदत /लमसम तत्वावरील शिक्षक / शिक्षकेत्तर पदावर भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुळ जाहिरातीत दिलेल्या पदानुसार तारखेला शैक्षणिक मुळ कागदपत्रासह मुलाखतीस हजर रहावे. जाहिरातीमधील माहितीनुसार मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ते दिले जाणार नाही.
Read Also : शैक्षणिक संस्थेत शिपाई, लिपिक व शिक्षक व शिक्षकेतर पदांवर भरती, येथे करा अर्ज
मुलाखतीचा पत्ता : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय वरिश्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बु. राजगुरुनगर, ता.खेड, जि.पुणे 410505 (कृपया मुळ जाहिरात वाचून घेणे)
मुलाखत दिनांक 26, 27 व 30 एप्रिल 2024, सकाळी 10.00 वाजता.