ITBP Head Constable Bharti 2024 : इंडो-तिबेटीयन पोलीस दलात  हेड कॉन्स्टेबल पदाच्या 112 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
ITBP Head Constable Bharti 2024

ITBP Head Constable Bharti 2024 : CRPF कायद्यांतर्गत भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Education and Stress Counselor) पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 112 जागा भरावयाच्या असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज दि.07/07/2024 पासून ते शेवट दिनांक 05/08/2024 पर्यंत करता येईल.

ITBP Head Constable Bharti 2024 Vacancy

ITBP तर्फे राबविण्यात येत असलेल्या या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही उमेदवार अर्ज करु शकतात. पदनिहाय संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)112
एकूण112

ITBP Head Constable Bharti 2024 Education Qualification       

हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराकडे मानसशास्त्र विषयातील पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.

Age Limit

हेड कॉन्स्टेबल पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 05/08/2024 रोजी 20 ते 25 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट असून SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

Fee

हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रुपये 100/- फि भरावी लागेल. SC/ST/ExSM/महिला प्रवर्गातील उमेदवारांना फि लागू नाही.

ITBP Head Constable Bharti 2024 Salary

हेड कॉन्स्टेबल पदावर निवड होण-या उमेदवारांना दरमहा रु.25,500-81,100/- वेतन मिळेल.

ITBP Head Constable Bharti 2024 date

अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक07/07/2024
अर्ज करण्याची शेवट दिनांक05/08/2024

ITBP Head Constable Bharti 2024 Selection Process

ITBP कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांची उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच फिजिकल चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर मेरीटवर आधारीत कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.

How to apply ITBP Head Constable Bharti 2024 online

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in  या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
  • त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
  • अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment