Indian Army TGC 140 Recruitment 2024 : ऑफिसर पदाच्या एकूण 30 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Army TGC 140
Indian Army TGC 140

Army TGC 140 : सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय सैन्यात TGC 140 ची भरती जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी 2025 पासून सुरु होणारी Army TGC 140 ची अधिसूचना आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर 140 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती दिली आहे. भारतीय लष्कर स्थायी आयोग (PC) साठी पात्र असलेले अविवाहित पुरुष आणि अभियांत्रिकी पदवी असलेल्या उमेदवारांनकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरील अभ्यासक्रम जानेवारी 2025 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) डेहराडून येथे सुरू होईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरु झाली असून दिनांक 10 एप्रिल 2024 पासून सुरू झाले असून दिनांक 9 मे 2024 पर्यंत अर्ज करता येईल. त्याबाबतची अधिक माहिती खाली दिली आहे. 

Army TGC 140 Post Details

इंजिनिअरींग शाखारिक्त संख्या
सिव्हील07
कॉम्प्यूटर सायन्स07
इलेक्ट्रिकल03
इलेक्ट्रॉनिक्स04
मेकॅनिकल07
Misc Engg Stream02
एकूण30

Indian Army TGC 140 Eligibility

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे (Engineering Degree) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असेल असे उमेदवार सुध्दा अर्ज करण्यास पात्र असतील. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी 01 जानेवारी 2025 पर्यंत सर्व सेमिस्टर/वर्षांच्या मार्कशीटसह अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. भारतीय मिलिटरी अकादमी (IMA) येथे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून 12 आठवड्यांच्या आत अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Age Limit

उमेदवाराचे वय दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान असावे. म्हणजेच TGC 140th Course साठी अर्ज करणारा उमेदवार 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान जन्मलेला असावा.

Application Fees

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवांराना परिक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार व OBC प्रवर्गातील उमेदवारांना रु.250/- शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST प्रवर्गासाठी रु.100/- परिक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

Army TGC 2024 Salary

निवड होणा-या उमदेवारांना दरमहा रु.20,600/- ते 32,400/- Salary/मानधन मिळेल.

Indian Army TGC 2024 Selection Process

Army TGC 140 कोर्ससाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना (1)लेखी परिक्षा, (2) SSB Interview, (3)Medical Test या तीन टप्प्यातून जावे लागणार आहे.

Important Dates

Online Application Starts : दिनांक 10 एप्रिल 2024

Last date of Online for : दिनांक 9 मे 2024

नाशिक येथे अप्रेंटिस पदाच्या जागा, इंजिनिअर असाल करा अर्ज

How to apply TGC 140 apply online

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने प्रथम https://joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
  • ‘Officer Entry / Login’ वर जाऊन ‘Register’ वर क्लिक करावे.
  • स्वतःची नोंदणी करून अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक भरावी.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
  • त्यांतर अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.
  • भविष्यातील संदर्भासाठी Army TGC 140 चा अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून ठेवावा.

Leave a Comment