
Indian Army RVC Bharti 2024 : भारतीय सैन्यामध्ये रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये Short Service Commission (SSC) साठी विवाहीत/अविवाहीत महिला/पुरुष पशुचिकित्सा उमेदवारांसाठी भरती जाहिर करण्यात आली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पशुचिकित्सा विज्ञान किंवा पशुपालन विषयामध्ये पदवीप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार असून दिनांक 20/05/2024 पासून ते शेवट दिनांक 03/06/2024 पर्यंत अर्ज पोहोचतील अशा पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
Indian Army RVC Bharti 2024 Vacancy
भारतीय सैन्यामध्ये रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदाच्या पुरुषांसाठी 12 जागा व महिलांसाठी 3 जागा अशा एकुण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी BVSc/BVSc & AH Degree असलेल्या उमेदवार अर्ज करु शकतात.
Indian Army RVC Bharti 2024 Education Qualification
व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची BVSc/BVSc & AH Degree उत्तीर्ण असावा तसेच इंटर्नशीप केलेले आवश्यक आहे. असेच उमेदवार ऑफलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात.
Indian Army RVC Bharti 2024 Age Limit
पशुचिकित्सा Short Service Commission (SSC) ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 20/05/2024 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षे असावे.
Indian Army RVC Bharti 2024 Fee
भारतीय सैन्यामध्ये रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
Indian Army RVC Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार Initial Screening, SSB Interview व Merit List आधारे निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड होणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.
हे पण वाचा : इंटिग्रल कोच फॅक्टरी आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या 1010 जागा
Indian Army RVC Bharti 2024 Application Process
भारतीय सैन्यामध्ये रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदावर अर्ज करण्यासाठी जाहिरातीमध्ये दिलेला नमुना A4 कागदावर व्यवस्थित टाईप करुन घ्यावा व त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी, तसेच सोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर शेवट दिनांक 03/06/2024 पुर्वी पोहोचेल अशा बेताने पोस्टाने पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), RK Puram, New Delhi- 110066
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |