Indian Army Rally Bharti 2024 : भारतीय सैन्य रॅली आयोजित 57 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Indian Army Rally Bharti 2024 : भारतीय सैन्यातर्फे विविध अग्निवीर पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी या पदाच्या एकुण 57 जागा भरण्यासाठी भरती जाहिर करण्यात आली असून पात्र आणि उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास दिनांक 20/06/2024 पासून सुरुवात होईल व दिनांक 08/09/2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Indian Army Rally Bharti 2024

Indian Army Rally Bharti 2024 Eligibility

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Army Rally Bharti 2024 Age Limit

भारतीय सैन्य रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्षे एवढे असणेआवश्यक आहे.

Indian Army Rally Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक20/06/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक08/09/2024

Indian Army Rally Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड लेखी परिक्षा, शारीरिक पात्रता / मैदानी चाचणी यामधील गुणांच्या मेरीटआधारे करण्यात येईल.

हे पण वाचा : BSF Group B and C Recruitment 2024 | BSF मध्ये Paramedical Staff च्या एकूण 141 जागा

Indian Army Bharti 2024 online form

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी Indian Army च्या https://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज नोंदणी करण्याकरीता “New User Registration” यावर click करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in Id व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
  • ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment