Indian Army bsc Nursing Course : आर्मीतर्फे बी.एस्सी. नर्सिंग करण्याची मुलींना संधी, ऑनलाईन प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Indian Army bsc Nursing Course : इंडियन आर्मीतर्फे शैक्षणिक वर्ष 2024-2028 साठीचे B.Sc. Nursing Course अभ्यासक्रमाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकुण 220 जागा असून ज्या महिला उमेदवांरांनी सन 2024 ची नीट परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा महिला उमेदवारांना इंडियन आर्मी मार्फत चार वर्षाचा बी.एस्सी. कोर्स पूर्ण करता येणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Indian Army bsc Nursing Course Vacancy

इंडियन आर्मीतर्फे एकूण 220 जागांवर B.Sc. Nursing Course साठी उमेदवारांची निवड करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. देशभरातील आर्मीच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश देऊन चार वर्षाचा बी.एस्सी. नर्सिंग कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

अ.क्र.संस्थेचे नाव जागा
1.CON, AFMC पुणे40
2.CON, CH(EC) कोलकाता30
3.CON, INHS अश्विनी, मुंबई40
4.CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5.CON, CH (CC) लखनऊ40
6.CON, CH (AF) बंगलोर40
 एकूण220

Indian Army bsc Nursing Course Eligibility

Army B.Sc. Nursing कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने इ.12 वी मध्ये Physics, Chemistry, Biology & English विषयासह किमान 50टक्के गुण मिळविलेले असावे. तसेच NEET (UG) 2024 असावा.

Indian Army bsc Nursing Course Age Limit

Army B.Sc. Nursing Course साठी प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 या दरम्यान असावा.

Exam Fee

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. General /OBC उमेदवारांना रु.200/- शुल्क तसेच SC/ST उमेदवारांना परिक्षा शुल्क लागू नाही.

Important Date

Army B.Sc. Nursing Course प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Indian Army bsc Nursing Course  Selection Process

जे पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करतील अशा उमेदवारांनी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार मेरीटआधारे व नीट परिक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांनी निवड करण्यात येणार आहे. तसेच उमेदवाराचे शारीरिक मोजमाप सुध्दा करण्यात येईल त्यानुसार पात्र उमेदवार निवडण्यात येईल. कृपया अधिकच्या माहितीसाठी मूळ पीडीएफ वाचावी.

Indian Army bsc Nursing Course Application Process

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
  • युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment