
इंडियन एयरफोर्समार्फत अधिकृत वेबसाईटवर इंडियन एयरफोर्स ग्रुप Y मेडीकल असिस्टंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. खास म्हणजे ह्या भरतीसाठी 12वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. जे उमेदवार इंडियन एअरफोर्समध्ये सेवा करु इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी रॅलीमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक 04 एप्रिल 2024 पर्यंत रॅलीमध्ये सहभाग घेता येऊ शकतो.
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरती शैक्षणिक पात्रता
ह्या भरतीमध्ये एअरमॅन ग्रुप Y पदासाठी रॅलीमध्ये सहभागी होणारा उमेदवार इयत्ता 12 वी सायन्स मध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित विषयामध्ये किमान 50टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचून घ्यावी.
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरती परिक्षा शुल्क
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नसून संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे.
Also Read : बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरती वयोमर्यादा
इंडियन एअरफोर्स ग्रुप Y रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांचा जन्म 24 जून 2003 पासून ते 24 जून 2007 या दरम्यान झालेला असावा असेच उमेदवार अर्ज करु शकतात.
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरती निवड प्रक्रिया
ह्या भरतीसाठी उमेदवारांची रॅली आयोजित केली जाणार असून रॅलीमध्ये शारीरिक पात्रता चाचणी, लेखी परिक्षा, कागदपत्र पडताळणी व मेडीकल चाचणी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरती अर्ज प्रक्रिया
इंडियन एयरफोर्स ग्रुप Y भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज करण्याची आवश्यकता नसून ज्यांना रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आहे अशा उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर दिनांक 28/03/2024 ते 04/04/2024 पर्यंत सहभागी होता येईल. कृपया मुळ जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |