
HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बँगलोर यांचेमार्फत विविध पदाची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. विविध पदाच्या एकुण 0182 जागा भरावयाच्या असून त्यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरींग डिप्लोमा व आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30/05/2024 ते शेवट दिनांक 12/06/2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
HAL Recruitment 2024 Notification
Post Name | Total Post |
Diploma Technician (Mechanical) (Scale – D6) | 29 |
Diploma Technician Electrical/ Electronics/ Instrumentation (Scale – D6) | 17 |
Operator (Fitter) (Scale – C5) | 105 |
Operator (Electrician) (Scale – C5) | 26 |
Operator (Machinist) (Scale – C5) | 2 |
Operator (Welder) (Scale – C5) | 1 |
Operator (Sheet Metal Worker) (Scale – C5) | 2 |
Total | 182 |
वरीलप्रमाणे एकुण 182 जागांवर भरती होणार असून इंजिनिअरींग पदवी, इंजिनिअरींग डिप्लोमा व आयटीआय पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. सदरील नोकरी ही फक्त चार वर्षाच्या कंत्राटी पध्दतीची असून पर्मनंट नाही याची कृपया नोंद घ्यावी. नोकरीचे ठिकाण पदानुसार वेगवेगळे असून निवड झाल्यास बंगलोर, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात या ठिकाणी काम करावे लागणार आहे.
HAL Recruitment 2024 Qualification
विविध पदाच्या या भरतीसाठी क्र.1 व 2 पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा उत्तीर्ण असावा. तसेच इतर पदांवर अर्ज करणारे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावे. (कृपया अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.)
HAL Recruitment 2024 Age
विविध पदाच्या ENGAGEMENT OF PERSONNEL ON TENURE BASIS IN NON-EXECUTIVE CADRE पदावर अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 01 मे 2024 रोजी 28 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट असून OBC साठी 3 वर्षे सूट आहे. वयाबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
HAL Recruitment 2024 Fee
Diploma Technician and Operators पदावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
HAL Recruitment 2024 Bangalore Salary
Diploma Technician पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु.46511/- पगार मिळेल. तर Operator पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु.44554/- एवढा पगार मिळेल. तसेच नियमानुसार इतर लाभ मिळतील. सदर भरती ही 4 वर्षाच्या कंत्राटी पध्दतीची आहे.
HAL Recruitment 2024 Bangalore Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची Short List द्वारे लेखी परिक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा 2 1/2 तासाची असून त्यामध्ये तीन पार्ट असतील. लेखी परीक्षेमध्ये उमेदवाराने किमान 60% गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवाराने 50% गुण मिळविणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमधील गुणांच्या आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल व त्यानंतर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी आणि मेडीकल चाचणी करण्यात येईल.
HAL Recruitment 2024 Bangalore Apply Online
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना https://hal-india.co.in/career या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्जामध्ये अलिकडे काढलेला पासपोर्ट फोटो, सही अपलोड करावा तसेच इतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावा.
Hal Recruitment 2024 Bangalore date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 30/05/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 12/06/2024 |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |