HAL Bharti 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हैद्राबाद येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 324 जागा भरावयाच्या असून त्यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आली आहे. त्यासाठी आयटीआय, डिप्लोमा व पदवीधरांसाठी ही चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड होणार असून दिनांक 20 ते 24 मे 2024 दरम्यान खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. तरी पात्र आणि इच्छुकांनी स्वखर्चाने सदर पत्त्यावर मुलाखतीस हजर राहणे आवश्यक आहे.
HAL Bharti 2024 Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
पदवीधर अप्रेंटिस | 89 |
डिप्लोमा अप्रेंटिस | 35 |
ITI अप्रेंटिस | 200 |
Total | 324 |
वरीलप्रमाणे एकुण 324 जागांवर भरती होणार असून इंजिनिअरींग पदवी, इंजिनिअरींग डिप्लोमा व आयटीआय पास असणारे उमेदवार मुलाखत देऊ शकतात. मुलाखतीसाठी हैद्राबाद येथे हजर रहावे.
HAL Bharti 2024 Education Qualification
ही भरती ‘अप्रेंटिस’ पदासाठी होणार असून उमेदवार आयटीआय अप्रेंटिस साठी संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ‘पदवीधर अप्रेंटिस’ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी असावी आणि ‘डिप्लोमा अप्रेंटिस’ साठी इंजिनिअरींग डिप्लोमा पास असावा. (कृपया अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचावी.)
HAL Bharti 2024 Fee
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
HAL Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार मुलाखत देणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.
HAL Apprentice Bharti Application Process
अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना हैद्राबाद येथे दिलेल्या तारखेनुसार मुळ कागदपत्रांसह मुलाखतीस हजर राहावे लागेल. मुलाखतीनंतर अर्जांची छाननी करुन शॉर्टलिस्टद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.
अधिकृत ITI जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत Graduate जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Interview Dates | 22 to 24 May 2024 |