GMC Kolhapur Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 102 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
GMC Kolhapur Bharti 2024

GMC Kolhapur Bharti 2024 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग-4 (गट-ड) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. शिक्षण पुर्ण करुन सरकारी नोकरीच्या शोधात असणा-या तरुण-तरुणींसाठी ही एक चांगली संधी आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 31/10/2024 ते 20/11/2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा.

GMC Kolhapur Bharti 2024 Overview

विभागाचे नावशासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर
पदाचे नावगट-ड (वर्ग-4)
एकूण पदसंख्या102
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीऑनलाईन परिक्षा
नौकरी ठिकाणकोल्हापूर
अर्ज सुरु होण्याचा दिनांक31/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक20/11/2024
अधिकृत वेबसाइटwww.rcsmgmc.ac.in
Kolhapur Jobs

GMC Kolhapur Bharti 2024 Vacancy

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत गड-ड संवर्गातील विविध पदाच्या 102 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)08
2.शिपाई (महाविद्यालय)03
3.मदतनीस (महाविद्यालय)01
4.क्ष-किरण परिचर (रुग्णालय)07
5.शिपाई (रुग्णालय)08
6.प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)03
7.रक्तपेढी परिचर (रुग्णालय)04
8.अपघात सेवक (रुग्णालय)05
9.बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)07
10.कक्ष सेवक (रुग्णालय)56
 Total102
Jobs Vacancy Kolhapur

GMC Kolhapur Bharti 2024 Eligibility Criteria

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)इ.10 वी पास
2.शिपाई (महाविद्यालय)इ.10 वी पास
3.मदतनीस (महाविद्यालय)इ.10 वी पास
4.क्ष-किरण परिचर (रुग्णालय)इ.10 वी पास
5.शिपाई (रुग्णालय)इ.10 वी पास
6.प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)इ.10 वी पास
7.रक्तपेढी परिचर (रुग्णालय)इ.10 वी पास
8.अपघात सेवक (रुग्णालय)इ.10 वी पास
9.बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)इ.10 वी पास
10.कक्ष सेवक (रुग्णालय)इ.10 वी पास

GMC Kolhapur Bharti 2024 Fees

ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग /आ.दु.घ. उमेदवारांना रु.900/- शुल्क भरावे लागेल.

GMC Kolhapur Bharti 2024 Age Limit

राजर्षी छत्रापती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे विविध पदावर अर्ज करण्यासाठी दिनांक 30/09/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ. उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Important Dates

दिनांक 11/10/2024 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 31/10/2024 रोजी पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होईल व 20/11/2024 पर्यंत अर्ज करता येईल. तसेच परिक्षेचा दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे.

Selection process

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

Online Apply

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://rcsmgmc.ac.in/ ह्या Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.

GMC Kolhapur Vacancy

Leave a Comment