FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकुण 98 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्ण असणा-या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे तसेच इ.10 वी पास असल्यास उत्तम. सदर प्रशिक्षण कालावधी फक्त एक वर्षासाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन त्याची प्रिंटआऊट व इतर कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 20/05/2024 पुर्वी अर्ज करावा. तसेच पोस्टाने अर्ज पाठविण्याचा शेवट दिनांक 25/05/2024 आहे.
FACT Bharti 2024 Vacancy
ट्रेड | पद संख्या |
फिटर | 24 |
मशीनिस्ट | 08 |
इलेक्ट्रिशियन | 15 |
प्लंबर | 04 |
मेकॅनिक मोटर व्हेईकल | 06 |
कारपेंटर | 02 |
मेकॅनिक (डिझेल) | 04 |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 12 |
वेल्डर (G & E) | 09 |
पेंटर | 02 |
COPA / फ्रंट ऑफिस असिस्टंट | 12 |
Total | 98 |
अशा विविध ट्रेडनुसार अप्रेंटिससाठी एकुण 98 जागा असून वरीलपैकी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणारे उमेदवार त्यासाठी अर्ज करु शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
FACT Bharti 2024 Education Qualification
ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्तीच्या शिक्षणाची आवश्यकता नाही.
FACT Bharti 2024 Age Limit
ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी 23 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट असून OBC साठी 3 वर्षे सूट आहे. वयाबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
FACT Bharti 2024 Fee
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
FACT Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.
FACT Bharti 2024 Application Process
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Google Form मध्ये नोंदणी करावी व त्यानंतर अर्जाची ऑनलाईन प्रिंट करुन खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN-683501
Read Also : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती, असा करा अर्ज
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |