
ECHS Bharti 2024 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Scheme] दानापूर येथे विविध पदांच्या 100 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ, चालक, चौकीदार, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, लिपिक इत्यादी रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असूनअर्ज प्रक्रिया ऑफलाईन असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ECHS Bharti 2024 Vacancy and Salary
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, दानापूर यांनी आयोजित केलेली आहे. ECHS Polyclinics Ara, Danapur, Hajipur, Mothihari, Chhapra, Muzaffarpur, Samastipur, Munger, Siwan, Khagaria, Sitamarhi, Bhagalpur, Madhubani, and Darbhanga येथे एक वर्षासाठी कंत्राटी पध्दतीने भरती करावयाची आहे. पद व पदांची संख्या, वेतन विषयी माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | पद संख्या | वेतन |
ओआयसी पॉलीक्लिनिक | 06 | रु.75,000/- |
वैद्यकीय अधिकारी | 10 | रु.75,000/- |
दंत अधिकारी | 05 | रु.75,000/- |
रेडिओग्राफर | 01 | रु.28,100/- |
प्रयोगशाळा सहाय्यक | 03 | रु.28,100/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 | रु.28,100/- |
फिजिओथेरपिस्ट | 02 | रु.28,100/- |
फार्मासिस्ट | 05 | रु.28,100/- |
नर्सिंग असिस्टंट | 12 | रु.28,100/- |
दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ | 05 | रु.28,100/- |
चालक | 12 | रु.19,700/- |
चौकीदार | 08 | रु.16,800/- |
महिला परिचर | 12 | रु.16,800/- |
शिपाई | 01 | रु.16,800/- |
सफाईवाला | 09 | रु.16,800/- |
लिपिक | 01 | रु.16,800/- |
ECHS Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ओआयसी पॉलीक्लिनिक | पदवी, Basic Computer Knowledge |
वैद्यकीय अधिकारी | MBBS पदवी, Basic Computer Knowledge |
दंत अधिकारी | BDS पदवी, Basic Computer Knowledge |
रेडिओग्राफर | रेडीओग्राफर डिप्लोमा / रेडीओग्राफर कोर्स (Armed Forces), Basic Computer Knowledge |
प्रयोगशाळा सहाय्यक | मेडीकल लॅबोरेटरी डिप्लोमा, Basic Computer Knowledge |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Lab Technology Diploma किंवा B.Sc. Nursing, Basic Computer Knowledge |
फिजिओथेरपिस्ट | फिजिओथेरेपी डिप्लोमा, Basic Computer Knowledge |
फार्मासिस्ट | डिप्लोमा किंवा फार्मसी पदवी, Basic Computer Knowledge |
नर्सिंग असिस्टंट | GNM कोर्स किंवा B.Sc. Nursing, Basic Computer Knowledge |
दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ | Diploma in Dental Hygiene Class 1 DH/DORA Course |
चालक | 8 वी पास, Driving License |
चौकीदार | 8 वी पास, GD Trade (Armed Forces) |
महिला परिचर | Basic Computer Knowledge |
शिपाई | 8 वी पास, GD Trade (Armed Forces) |
सफाईवाला | शिक्षित |
लिपिक | पदवी, Computer Knowledge |
ECHS Bharti 2024 Age Limit
ECHS तर्फे जाहिर झालेल्या या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पुर्ण असावे. तसेच जास्तीत जास्त 53 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (वयामध्ये सूट विषयी अधिक माहिती जाहिरातीमध्ये वाचून घ्यावी.)
Fee
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
Salary
ESCH मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार दरमहा रु.16,800/- ते 75,000/- एवढा पगार मिळणार आहे.
ECHS Bharti 2024 Last Date
दिनांक 16/04/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून दिनांक 30/04/2024 पर्यंत पोस्टाने अर्ज पोहोचली अशा बेताने अर्ज पाठवावे.
Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार मुलाखत, ट्रेड टेस्ट व कागदपत्रांची पडताळणी करुन उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
Read Also : AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 422 जागा, थेट मुलाखतीमधून निवड
How to Apply ECHS Form
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे स्व-साक्षांकित करुन पोस्टाने खालील पत्त्यावर दिनांक 30/04/2024 पुर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS, Stn HQ Cell, C/o HQ J&B उपक्षेत्र, दानापूर कँट, पटना (बिहार) – 801503
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |