DRDO DMRL Bharti 2024 : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती, असा करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

DRDO DMRL Bharti 2024 : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा हैद्राबाद यांच्या अंतर्गत ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकुण 127 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता 10वी व ITI उत्तीर्ण असणा-या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्रता असूनही हाताला कामधंदा नसल्याने बेरोजगार उमेदवारांनी ह्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 31/05/2024 पुर्वी अर्ज करावा.

DRDO DMRL Bharti 2024 Vacancy

  1. फिटर – 20
  2. टर्नर – 08
  3. मशीनिस्ट – 16
  4. वेल्डर – 04
  5. इलेक्ट्रिशियन – 12
  6. इलेक्ट्रॉनिक्स – 04
  7. कोपा – 60
  8. कारपेंटर – 02
  9. बुक बाईंडर – 01

अशा विविध ट्रेडनुसार अप्रेंटिससाठी एकुण 127 जागा असून वरीलपैकी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणारे उमेदवारा त्यासाठी अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

DRDO DMRL Bharti 2024 Education Qualification

ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवार  इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्तीच्या शिक्षणाची आवश्यकता नाही.

DRDO DMRL Bharti 2024 Age Limit

ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी वयाबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

DRDO DMRL Bharti 2024 Fee

अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.

DRDO DMRL Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.

DRDO DMRL Bharti 2024 Application Process

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी  https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवरुन अप्रेंटिससाठी नोंदणी करावी व कागदपत्रे अपलोड करुन आधार सत्यापित करुन घ्यावे. अर्जामध्ये असलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपुर्वक भरावी व अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.

Leave a Comment