
DRDO ACEM Bharti 2024 : नाशिक येथील Advanced Center for Energetic Materials म्हणजेच ACEM मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकुण 41 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. इंजिनिअरींगची पदवी किंवा डिप्लोमा असणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांनी शेवट दिनांक 30/04/2024 पुर्वी अर्ज करावा.
DRDO ACEM Bharti 2024 Vacancy
पदवीधर अप्रेंटिस 30 जागा व डिप्लोमा अप्रेंटिस 11 जागा अशा 41 जागा असून त्यासाठी बी.ई./बी.टेक किंवा बी.एस्सी. असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. त्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
DRDO ACEM Bharti 2024 Education Qualification
1) पदवीधर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरींग क्षेत्रातील Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/Aerospace/Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering या विषयामध्ये बी.ई./बी.टेक पदवी किंवा Computer Science/ Chemistry/Physics या विषयामध्ये बी.एस्सी. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) डिप्लोमा अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing या विषयामध्ये इंजिनिअरींग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
DRDO ACEM Bharti 2024 Fee
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
DRDO ACEM Bharti 2024 Selection Process
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्ट लिस्ट आधारे मुलाखत घेण्यात येईल व मुलाखतीच्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल. मुलाखतीची तारीख उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. निवडीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य असेल.
DRDO ACEM Bharti 2024 Salary
पदवीधर अप्रेंटिस पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु.12,000/- मानधन देण्यात येईल तसेच डिप्लोमा अप्रेंटिस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु.10,000/- मानधन मिळणार आहे.
DRDO ACEM Bharti 2024 Application Process
पदवीधर अप्रेंटिस व डिप्लोमा अप्रेंटिस या पदावर अर्ज करण्यासाठी खालील पीडीएफ फाईलमध्ये नमुना दिलेला आहे. त्यामधून नमुना अर्ज टाईप करुन घ्यावा व त्यावर फोटो, सही व इतर कागदपत्रांसह स्कॅन करुन apprentice.acem@gov.in या ईमेलवर पाठवावा लागणार आहे.
शेवट दिनांक 30/04/2024
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF Application Form | येथे क्लिक करा |