
Chandrapur DCC Bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपाई पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी निर्माण झाली आहे. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्यास इच्छुक आहेत व नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून शेवट दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. |
पदाचे नाव | लिपिक व शिपाई |
एकूण पदसंख्या | 358 |
अर्ज पद्धती | Online |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 08/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 22/10/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://cdccbank.co.in |
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Vacancy
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर मार्फत लिपिक व शिपाई पदाच्या 358 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | लिपिक | 261 |
2. | शिपाई | 97 |
358 |
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Eligibility Criteria
लिपिक : पदावर अर्ज करणा-या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एमएससीआयटी परीक्षा पास. बँकिंग क्षेत्रातील अनुभव व मराठी / इंग्रजी टंकलेखन / लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
शिपाई : इ.10 वी पास
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Fees
उमेदवारांना लिपिक व शिपाई पदावर अर्ज करण्यासाठी रु.560.50 भरावी लागणार आहे.
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Age Limit
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर या बँकेच्या आस्थापनेवर निघालेल्या लिपिक पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे असावे. तर शिपाई पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
Important Dates
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 08/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 22/10/2024 असणार आहे. प्रवेशपत्र दि.06/11/2024 व परीक्षा 09, 10 व 11 नोव्हेंबर 2024.
Selection process
जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखीतीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
How to Apply
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://www.cdccrecruitment.in/home ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |