BSF Group B and C Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल Directorate General Border Security Forces (BSF) यांचे आस्थापनेवरील पॅरामेडीकल पदाच्या विविध जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये पॅरा मेडिकल स्टाफ, श्रीमती. (कार्यशाळा), पशुवैद्यकीय कर्मचारी, निरीक्षक (ग्रंथपाल) या पदाच्या एकुण 141 जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दिनांक 18/05/2024 पासून ते शेवट दिनांक 16/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

BSF Group B and C Recruitment 2024 Vacancy Details
सीमा सुरक्षा दलातर्फे भरण्यात येत असलेल्या 141 पॅरामेडीकल पदाची प्रवर्गनिहाय संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
Paramedical Staff Group B and Group C
पदाचे नाव | एकूण संख्या | पे-स्केल |
SI (Staff Nurse) | 14 | Rs.35,400-1,12,400/- |
ASI (Lab Technician) | 38 | Rs.29,200-92,300/- |
ASI (Physiotherapist) | 47 | Rs.29,200-92,300/- |
SMT वर्कशॉप Group B
पदाचे नाव | एकूण संख्या | पे-स्केल |
SI (Vehicle Mechanic) | 03 | Rs.35,400-1,12,400/- |
Constable (OTRP) | 01 | Rs.21,700-69,100/- |
Constable (SKT) | 01 | Rs.21,700-69,100/- |
Constable (Fitter) | 04 | Rs.21,700-69,100/- |
Constable (Carpenter) | 02 | Rs.21,700-69,100/- |
Constable (Auto Elect) | 01 | Rs.21,700-69,100/- |
Constable (Vehicle Mechanic) | 22 | Rs.21,700-69,100/- |
Constable (BSTS) | 02 | Rs.21,700-69,100/- |
Constable (Upholster) | 01 | Rs.21,700-69,100/- |
व्हेटरनरी स्टाफ :
पदाचे नाव | एकूण संख्या | पे-स्केल |
Head Constable | 01 | Rs.25,000-81,100/- |
Constable (Kennelman) | 02 | Rs.25,000-81,100/- |
Inspector (Librarian) | 02 | Rs.44,900-1,42,400/- |
BSF Group B and C Recruitment 2024 Eligibility
विविध पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दर्शविण्यात येत आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
SI (Staff Nurse) | GNM course completed from a recognised institute. | 21 to 30 Years |
ASI (Lab Technician) | Passed the Lab Technician Diploma from a recognised/ registered institute | 18 to 25 years |
Constable (OTRP), Constable (SKT), Constable (Fitter), Constable (Carpenter), Constable (Auto Elect), Constable (Veh Mech), Constable (BSTS), Constable (Upholster), SI (Vehicle Mechanic) | ITI in the respective trade or have three years of relevant experience. | 30 Years |
Head Constable (Veterinary) | 12th grade with a qualification in Biology or Veterinary Livestock Development Assistant (VLDA). | 18 to 25 Years |
Constable (Kennelman) | 10th grade and have at least two years of relevant experience. | 18 to 25 Years |
Inspector (Librarian) | Library Science Degree from a recognized institution. | Candidates should be up to 30 years old as of January 1, 2024. |
BSF Group B and C Recruitment 2024 Fee
सीमा सुरक्षा दलामध्ये निघालेल्या विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. अमागास / खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- परीक्षा शुल्क भरावे लागेल तर SC/ST उमेदवारांना शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.
BSF Group B and C Recruitment 2024 last date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 18/05/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 16/06/2024 |
BSF Group B and C Recruitment 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड लेखी परिक्षा, शारीरिक पात्रता / मैदानी चाचणी यामधील गुणांच्या मेरीटआधारे करण्यात येईल.
हे पण वाचा : IITM Recruitment 2024 | IITM Pune येथे विविध पदाच्या एकुण 065 जागा, त्वरीत करा अर्ज
BSF group b and c recruitment 2024 apply online
- अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी BSF च्या www.rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- अर्ज नोंदणी करण्याकरीता “Candidate Login” यावर Click करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in Id व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
- ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
- आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
- ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |