BHC Aurangabad Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अनुवादक आणि दुभाषी पदाची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
BHC Aurangabad Recruitment 2024

BHC Aurangabad Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नविन भरती निघाली आहे. त्यासाठीची अधिकृत जाहिरात उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली असून एकुण 007 पदावर ही भरती प्रक्रिया होत असून कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदासाठी ही भरती होणार आहे. सदर पदावर पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 15/05/2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 29/05/2024 पुर्वी अर्ज करावा लागणार आहे.

BHC Aurangabad Recruitment 2024 Vacancy Details

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जाहिर झालेल्या कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) पदावर भरती करण्यासाठी एकुण 07 रिक्त भरण्यात येणार आहे.

BHC Aurangabad Recruitment 2024 Educational Qualification

  1. कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवार MS-CIT पास असावा.

Age Limit

कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) पदावर अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमदेवाराचे दिनांक 10 मे 2024 रोजी वय 18 वर्षे 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. (अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.)

Exam Fee

Bombay High Court Aurangabad Recruitment 2024 साठी अर्ज करणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु.200/- परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे.

BHC Aurangabad Recruitment 2024 Salary

जाहिरात दिलेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना रु.49100/- ते 155800/- एवढा प्रतिमहिना पगार मिळेल.

BHC Aurangabad Recruitment 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक15/05/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक29/05/2024

BHC Aurangabad Recruitment 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शॉर्टलिस्ट आधारे परीक्षेसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर उमदेवारांची 100 गुणांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर मुलाखती आधारे निवड करण्यात येणार आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)

Read also : BHC Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपिक पदाची भरती, पदवीधरांना संधी

BHC Aurangabad Recruitment 2024 online form apply online Maharashtra

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मुंबई हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद च्या https://bhc.gov.in/aurtranslator2024/home.php Aurangabad High Court recruitment 2024 या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज नोंदणी करण्याकरीता ”Registration” यावर क्लिक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी, ई-मेल आयडी, फोटो सही अपलोड करावा.
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment