Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 पदासाठी भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Bank of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जात आहे. याच बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदाच्या एकुण 195 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. दिनांक 10/07/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 26/07/2024 पुर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहोचतील अशा पध्दतीने पाठवावेत.

Vacancy Details

बँक ऑफ महाराष्ट्राच्या आस्थापनेवर विविध पदाच्या जागा भरावयाच्या असुन पदाचे नाव संख्या खालील तक्त्यात देत आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी जनरल मॅनेजर01
2असिस्टंट जनरल मॅनेजर06
3चीफ मॅनेजर38
4सिनियर मॅनेजर35
5मॅनेजर115
6बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर10
एकुण195

Bank of Maharashtra Bharti 2024 Educational Qualification

  1. पद क्र.1:  वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी, ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र  आणि 12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी आणि 10 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन/ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics)  किंवा MCA/CFA/MBA आणि 10 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6:  60% गुणांसह पदवीधर व MBA (Marketing)/PGDBA आणि 03 वर्षे अनुभव

Age Limit

सदर भरतीकरीता अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 30 जून 2024 रोजी खालीलप्रमाणे असावे.

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45/50 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षे सूट असुन SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सुट आहे.

Exam Fee

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये निघालेल्या या भरतीकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फि भरावी लागणार आहे. General/OBC/EWS साठी ₹1180/- रुपये आणि SC/ST/PWD साठी ₹180/- रुपये भरावे लागतील.

Bank of Maharashtra Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक10/07/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक26/07/2024

Bank of Maharashtra Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शॉर्टलिस्ट आधारे परीक्षेसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर उमदेवारांची 50 गुणांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर मुलाखती आधारे निवड करण्यात येणार आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)

Bank of Maharashtra Bharti 2024 Apply Form

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पीडीएफ फॉरमॅटमध्ये दिलेला अर्ज भरुन त्यासोबत आवश्यक असलेले कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005

Indian Bank Apprentice Bharti 2024 : इंडियन बँकेत अप्रेंटिस पदाच्या एकुण 1500 जागा

Leave a Comment