Atma Malik Bharti Ahmednagar | शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर पदांवर भरती, येथे करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Atma Malik Bharti Ahmednagar

Atma Malik Bharti Ahmednagar | आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, वसतीगृह शिक्षक व मदतनीस पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळावी अशी आशा बाळगणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लेखामध्ये दिलेल्या पत्त्यावर तारखेनुसार हजर राहणे आवश्यक आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.

Atma Malik Bharti Ahmednagar Vacancy

Atma Malik Foundation आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर येथील संस्थेत एकुण 59 पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कर्मचारी भरण्यात येणार आहेत.

प्राथमिक शिक्षक – विज्ञान व इंग्रजी, माध्यमिक शिक्षक इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, समाजशास्त्र, विज्ञान, संगणक व वसतिगृह शिक्षक/ शिक्षिका व मदतनीस  पदांच्या जागा तर CET/TET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इंग्रजी माध्यमासाठी English Speaking Skill अनिवार्य आहे. उमेदवारांच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक पगार देण्यात येणार आहे.

Atma Malik Bharti Ahmednagar Educational Qualification

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे दर्शविली आहे. वरीलप्रमाणे विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी HSC / B.Sc./B.A., D.Ed./ B.Ed. तर माध्यमिक शिक्षक पदासाठी B.A./ M.A., B.Sc./M.Sc./B.Ed./M.Ed., BCA, BCS, Computer Diploma आदि शैक्षणिक पात्रता आवशयक आहे. उमेदवारानी अर्ज करण्याअगोदर मुळ जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.

Atma Malik Bharti Ahmednagar Age Limit

या शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्जकरण्यासाठी उमेदराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

Read Also : आदिवासी विकास विभागात 611 पदांची भरती

Atma Malik Bharti Ahmednagar Fees

आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

Atma Malik Bharti Ahmednagar Online Apply

आत्मा मालिक शैक्षणिक संस्था कोकमठाण, ता.कोपरगाव,‍ जि.अहमदनगर येथे कायम विनाअनुदानित रिक्त पदावर भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 09 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर स्वत: हजर राहावे. मुलाखतीस जातांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांची Xerox सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन जाणे. जाहिरातीमधील माहितीनुसार मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ते दिले जाणार नाही.

Read Also : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका पदाच्या 102 जागांची भरती

Atma Malik Bharti Ahmednagar Address

मुलाखतीचा पत्ता : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर- 423601.

मुलाखत वेळ : दिनांक 09 ते 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

atma malik bharti ahmednagar vacancy

Leave a Comment