Atma Malik Bharti 2024 | आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, पुरणगाव, पो. जळगाव नेऊर, ता. येवला, जि.नाशिक या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहायक, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक तसेच इतर जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळावी अशी आशा बाळगणारे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लेखामध्ये दिलेल्या पत्त्यावर तारखेनुसार हजर राहणे आवश्यक आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.
Atma Malik Bharti Nashik Vacancy
Atma Malik Foundation ता.येवला, जि. नाशिक येथील संस्थेत एकुण 140 पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कर्मचारी भरण्यात येणार आहेत.
शिक्षकेतर कर्मचारी : शिपाई, सुरक्षारक्षक, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहायक, सुपरवायझर, आचारी, आचारी मदतनीस, भांडे साफसफाई, आश्रम मदतनीस, प्रसाद वाटप पुरुष व इतर पदे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये येतात.
वसतिगृह विभाग : वसतिगृह अधिक्षक, अधिक्षिका, पुरुष वसतिगृह शिक्षक, महिला वसतिगृह शिक्षक, वसतिगृह आया, एनसीसी व मिलिटरी प्रशिक्षक व इतर पदे.
प्राथमिक व माध्यमिक विभाग : इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला व संगीत शिक्षक, ग्रंथपाल व इतर.
उच्च प्राथमिक व माध्यमिक विभाग : इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र प्राध्यापक व इतर पदे भरण्यात येणार आहे. CET/CTET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इंग्रजी माध्यमासाठी English Speaking Skill अनिवार्य आहे. उमेदवारांच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक पगार देण्यात येणार आहे.
Atma Malik Bharti Nashik Educational Qualification
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे दर्शविली आहे. विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार 5वी, 7वी, 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, बी.ए., एम.ए., बीएस्सी., एमएस्सी, डी.टी.एड, बीएड, एमएड, बीसीए/बीसीएस/ कॉम्प्यूटर आदि शैक्षणिक पात्रता आवशयक आहे. उमेदवारानी अर्ज करण्याअगोदर मुळ जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
Atma Malik Bharti Nashik Age Limit
या शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
Atma Malik Bharti Nashik Fees
आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत विविध पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
Atma malik bharti nashik online apply
आत्मा मालिक शैक्षणिक संस्था पुरगाव व येवला येथे कायम विनाअनुदानित रिक्त पदावर भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 20, 21 व 23,24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर स्वत: हजर राहावे. मुलाखतीस जातांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन जाणे. जाहिरातीमधील माहितीनुसार मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ते दिले जाणार नाही.
Atma malik bharti nashik address
मुलाखतीचा पत्ता : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल नाशिक – येवला रोड, मु. पुरणगाव, पो. जळगाव नेऊर, ता.येवला, जि.नाशिक 423401. मो.9975277651, 9689342839, 9970710163.
मुलाखत वेळ : दिनांक 20, 21 व 23,24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Walk In Interview | येथे क्लिक करा |