
AIIMS Nursing Officer Admit Card नर्सिंग ऑफिसर पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात मार्च २०२४ मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक १७ मार्च २०२४ पुर्वी अर्ज दाखल केले होते.
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार नर्सिंग ऑफिसर पदाच्या जागा भरण्यासाठी B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव पात्रता ठरवून दिली होती. त्याचे AIIMS Nursing Officer Admit Card प्राप्त झाले आहे.
जे उमेदवार १७ मार्च २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे वय पुर्ण करतात असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करु शकणार होते.
सर्वसाधारण व इतर मागासवर्गातील उमेदवारांना रु.३०००/- अर्ज शुल्क भरणे आवश्यक. तसेच एससी/एसटी उमेदवारांना रु.२४००/- शुल्क भरावयाचे होते.
ह्या भरतीसाठी एकत्रित परिक्षा होणार असून दोन टप्प्यात परिक्षा पार पडणार आहेत. १४ एप्रिल २०२४ रोजी पहिला टप्पा पार पडेल तर दुसरा टप्पा ५ मे २०२४ रोजी पार पडणार आहे.
यशस्वीरित्या अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे AIIMS Nursing Officer Admit Card जाहिर करण्यात आले आहेत. उमेदवार डायरेक्ट लिंकवरुन डाऊनलोड करुन घेऊ शकतात.