
AIESL Bharti 2024 | Air Indian Services Limited मध्ये Aircraft Technician आणि Trainee Aircraft Technician पदाच्या एकुण 100 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर भरती ही कंत्राटी पध्दतीची असून इंजिनिअरींग क्षेत्रातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी आहे. ज्या उमेदवारांचे संबंधित इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा इंजिनिअरींग पदवी शिक्षण पूर्ण झालेले आहे अशा पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 05/06/2024 पासून ते शेवट दिनांक 25/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
AIESL Bharti 2024 Vacancy
AIESL तर्फे होत असलेल्या या भरतीसाठी वेगवेगळ्या दोन पदांसाठी ही भरती आयोजित केली आहे. पदाचे नाव व पदसंख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) | 72 |
2. | एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) | 28 |
Total | 100 |
AIESL Bharti 2024 Eligibility
AIESL मध्ये एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन B1 व B2 पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.
- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) – 60% गुणांसह AME (Mechanical) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एक वर्ष अनुभव.
- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) – 60% गुणांसह AME (Avionics) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electronics/ Telecommunication/ Radio/Instrumentation Engineering) आणि एक वर्ष अनुभव.
Age Limit
AIESL भरतीसाठी दोनही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 01/06/2024 रोजी 35 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे सुट असून SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहे.
Fee
AIESL तर्फे निघालेल्या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. General /OBC प्रवर्गासाठी Rs.1000/- फि भरावी लागेल तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना फि नाही.
Salary
AIESL तर्फे निघालेल्या दोनही पदासाठी नियुक्त होणा-या Aircraft Technician Rs.27,940/- पगार मिळेल तर Trainee Aircraft Technician Rs.15,000/- Stipend मिळेल.
AIESL Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 05/06/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 25/06/2024 |
AIESL Bharti 2024 Selection Process
AIESL तर्फे निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही कंत्राटी पध्दतीवर होणार असून निवड होण्यासाठी उमेदवारांची Skill Test / Trade Test & Technical Assessment आणि Personal Interview द्वारे निवड करण्यात येणार आहे.
AIESL Bharti 2024 Apply Online
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online वरील गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Aircraft Technician | येथे क्लिक करा |
Trainee Aircraft Technician | येथे क्लिक करा |