
AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या एकुण 1049 जागा भरण्यासाठीची जाहिराती प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. सदर भरती ही 3 वर्षाच्या कंत्राट पध्दतीची असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार पदवीधर उमेदवारांना ही उत्तम संधी प्राप्त झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. दिनांक 29/06/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 14/07/2024 पर्यंत अर्ज करता येईल.
AIASL Bharti 2024 Vacancy
खालील तक्त्यामध्ये विविध पदानुसार पद संख्या दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 343 |
2 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 706 |
एकूण | 1049 |
AIASL Bharti 2024 Education Qualification
- पद क्र.1 : पदवीधर आणि 5 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : पदवीधर
Age Limit
AIASL तर्फे जाहिर झालेल्या या भरतीसाठी पद क्र.1 साठी 01 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 33 वर्षे असावे तर पद क्र.2 साठी 28 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
Fee
AIASL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General व OBC प्रवर्गातील उमेदवारांना 500/- शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क लागू नाही.
AIASL Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 29/06/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 14/07/2024 |
ऑनलाईन पेमेंट शेवट दिनांक | 14/07/2024 |
How to apply AIASL Bharti 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://forms.gle/S5rQCeWWZbz9Qewt8 लिंकवर जा.
- विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरा.
- शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.
AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 3256 जागा, थेट मुलाखतीमधून निवड
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |