AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 422 जागा, थेट मुलाखतीमधून निवड

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
AIASL Bharti 2024
Air India Air Services Limited

AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या एकुण 422 जागा भरण्यासाठीची जाहिराती प्रसिध्द करण्यात आली आहे. Utility Agent Cum Ramp Driver आणि Handyman / Handywoman या दोन पदासाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवाराकडे इ.10 वी पास व ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पुरुष आणि महिला उमेदवारांना ही उत्तम संधी प्राप्त झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या दिनांक व वेळेनुसार दिलेल्या पत्त्यावर अर्जाची प्रिंट करुन भरलेला अर्ज व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

AIASL Bharti 2024 Vacancy

एअर इंडिया एअर सर्विसेसतर्फे आयोजित केलेल्या भरतीमध्ये यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन merchant navy helper job या पदावर निवड करण्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

पदाचे नावपद संख्या
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर130
हँडीमन/हँडीवूमन292
Total422
Aiasl bharti eligibility

AIASL Bharti 2024 Education Qualification

वरील दोन्ही पदापैकी यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर साठी उमेदवार 10 वी पास व HMV ड्रायविंग लायसन्स असावे. तसेच हँडीमन/हँडीवूमन साठी इ.10 वी पास असणे आवश्यक आहे.

AIASL Bharti 2024 Age Limit

AIASL तर्फे जाहिर झालेल्या या भरतीसाठी दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.

AIASL Bharti 2024 Fee

AIASL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सर्वसाधारण व OBC प्रवर्गातील उमेदवारांना 500/- Demand Draft शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क लागू नाही.

AIASL Bharti 2024 Salary

AIASL तर्फे यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु.24,960/- पगार मिळणार आहे. तसेच हँडीमन/हँडीवूमन पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु.22,530/- एवढा पगार मिळेल.

AIASL Bharti Date

एजंट कम रॅम्प ड्रायव्हरदिनांक 02 मे 2024 सकाळी 9.00 ते दुपारी 12.00
हँडीमन/हँडीवूमनदिनांक 04 मे 2024 सकाळी 9.00 ते दुपारी 12.00
Aiasl bharti salary

AIASL Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या PDF मधील अर्जाचा नमुना प्रिंट करुन भरुन घ्यावा व रुपये 500/- डीडी काढावा. तसेच मुळ शैक्षणिक कागदपत्र व झेरॉक्स प्रतीसह जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने दिनांक 02/05/2024 व 04/05/2024 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे लागेल. नोकरीचे ठिकाण चेन्नई असून मुलाखतीनुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

Read Also : Atma Malik Bharti 2024 | शैक्षणिक संस्थेत शिपाई, लिपिक व शिक्षक व शिक्षकेतर पदांवर भरती, येथे करा अर्ज

मुलाखतीचे ठिकाण :

Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark : Near Taj Catering.

Leave a Comment