AFMS Bharti 2024 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 450 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
AFMS Bharti 2024

AFMS Bharti 2024 : Indian Army, Armed Forces Medical Services (AFMS) यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी SSC मेडीकल ऑफिसर पदाच्या जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. एकुण 450 जागा भरावयाच्या असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी दि.16/07/2024 पासून ते शेवट दिनांक 04/08/2024 पर्यंत लिंक ओपन राहील.

AFMS Bharti 2024 Vacancy

Indian Army, Armed Forces Medical Services (AFMS) यांच्यातर्फे होत असलेल्या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही उमेदवार अर्ज करु शकतात. पदाची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपुरुष व महिलापद संख्या
1SSC मेडिकल ऑफिसरपुरुष338
महिला112
एकूण 450

AFMS Bharti 2024 Education Qualification

सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. MBBS उत्तीर्ण असावा. तसेच 15 ऑगस्ट 2024 पूर्वी इंटर्नशिप पुर्ण केलेले असावे. तसेच राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक अर्ज करण्यास पात्र असतील.

AFMS Bharti 2024 Age Limit

सशस्त्र सेनेत मेडिकल ऑफिसर पदावर निवड होण्यासाठी दिनांक 31/12/2024 रोजी उमेदवाराचे वय 30/35 वर्षापर्यंत असावे.

AFMS Bharti 2024 Fee

सशस्त्र सेनेत मेडीकल ऑफिसर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रुपये 200/- फि भरावी लागेल.

AFMS Bharti 2024 date

अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक16/07/2024
अर्ज करण्याची शेवट दिनांक04/08/2024
मुलाखत28/08/2024 पासून
मुलाखतीचे ठिकाणआर्मी हॉस्पीटल, दिल्ली कॅन्ट.

Selection Process

मेडीकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांची मुलाखत होणार असून गुणांच्या आधारे मेरीटवर आधारीत कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.

How to apply AFMS Bharti 2024 online

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://amcsscentry.gov.in/ या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
  • त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
  • अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment