Adivasi Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभागात 611 पदांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Adivasi Vibhag Bharti 2024

Adivasi Vibhag Bharti 2024 :  आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या गट-ब अराजपत्रित संवर्ग व गट-क संवर्गातील जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये इ.10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतील अशा उमेदवारांसाठी ह्या विभागात एकूण 611 जागांवर भरती होणार आहे. सदर भरती सरळसेवेने होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवार पात्रतेनुसार विविध पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून पात्रतेनुसार शेवट दिनांक 02 नोव्हेंबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

Adivasi Vibhag Bharti 2024 Overview :

विभागाचे नावआदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य
पदाचे नावगट-क संवर्गातील पदे
एकूण पदसंख्या611
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीऑनलाईन परिक्षा
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याचा दिनांक12/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक02/11/2024
अधिकृत वेबसाइटhttps://tribal.maharashtra.gov.in/
आदिवासी विकास विभाग भरती 2024

Adivasi Vibhag Bharti 2024 Vacancy :

आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत वर्ग-3 संवर्गातील विविध पदाच्या 611 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2.संशोधन सहाय्यक19
3.उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4.आदिवासी विकास निरीक्षक01
5.वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
6.लघुटंकलेखक10
7.अधीक्षक (पुरुष)29
8.अधीक्षक (स्त्री)55
9.गृहपाल (पुरुष)62
10.गृहपाल (स्त्री)29
11.ग्रंथपाल48
12.सहाय्यक ग्रंथपाल01
13.प्रयोगशाळा सहाय्यक30
14.कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16.उच्चश्रेणी लघुलेखक03
17.निम्नश्रेणी लघुलेखक14
 Total611
आदिवासी विकास विभाग भरती 2024

Adivasi Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria :

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2.संशोधन सहाय्यकपदवीधर
3.उपलेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर
4.आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर
5.वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर
6.लघुटंकलेखक10वी पास, लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7.अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8.अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9.गृहपाल (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10.गृहपाल (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11.ग्रंथपालइ.10वी पास व ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12.सहाय्यक ग्रंथपालइ.10वी पास व ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13.प्रयोगशाळा सहाय्यकइ.10वी पास
14.कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटरइ.12वी पास, फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र व 03 वर्षे अनुभव
15.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी
16.उच्चश्रेणी लघुलेखकइ.10वी पास, इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. तसेच MS-CIT
17.निम्नश्रेणी लघुलेखकइ.10वी पास,  इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व MS-CIT

Adivasi Vibhag Bharti 2024 Fees :

ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग व माजी सैनिक उमेदवारांना रु.900/- शुल्क भ्ररावे लागेल.

Adivasi Vibhag Bharti 2024 Age Limit :

आदिवासी विकास विभागामध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01/11/2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Adivasi vibhag bharti 2024 exam date :

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 12/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 02/11/2024 असणार आहे.

हे पण वाचा – पुणे समाज कल्याण विभागात 219 पदांची भरती

Adivasi Vibhag Bharti 2024 Selection process :

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

How to apply Adivasi Vibhag Bharti 2024 :

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.

Leave a Comment