
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटीव’ पदाच्या एकुण 490 जागा भरण्यासाठीची अधिसूचना फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जे उमेदवार इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण आहे आणि सरकारी नोकरीचा शोध घेत आहेत अशा उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 02 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 अशी आहे.
AAI Bharti 2024 Vacancy Details
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर एक्झिक्युटीव पदाच्या एकुण 490 जागा भरण्यात येत आहेत. पदाचे नाव व एकुण उपलब्ध पदसंख्या याबाबतची माहिती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1. | ज्युनियर आर्किटेक्चर एक्झिक्युटिव | 03 |
2. | ज्युनियर सिव्हिल एक्झिक्युटिव | 90 |
3. | ज्युनियर इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव | 106 |
4. | ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव | 278 |
5. | ज्युनियर IT एक्झिक्युटिव | 13 |
एकूण | 490 |
AAI Bharti 2024 Educational Qualification
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदाचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील तक्त्यामध्ये दर्शविल्यानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | पात्रता |
ज्युनियर आर्किटेक्चर एक्झिक्युटिव | Architecture Engineering Degree व GATE 2024 |
ज्युनियर सिव्हिल एक्झिक्युटिव | B.E. किंवा B.Tech in Civil व GATE 2024 |
ज्युनियर इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव | B.E. किंवा B.Tech in Electrical व GATE 2024 |
ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव | B.E. किंवा B.Tech in Electronics / Telecommunications / Electrical व GATE 2024 |
ज्युनियर IT एक्झिक्युटिव | B.E. किंवा B.Tech in Computer Science / Computer Engineering / IT / Electronics किंवा MCA व GATE 2024 |
Age Limit
ज्युनियर एक्झिक्युटिव पदावर अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट असून SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Fees
भारतीय विमानतळ प्राधिकरणा तर्फे राबविण्यात येत असलेल्या ज्युनियर एक्झिक्युटिव पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये खुला व ओबीसी प्रवर्गासाठी 300/- रुपये शुल्क असून SC/ST व महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू नाही.
Selection Process
ज्युनियर एक्झिक्युटिव पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची GATE-2024 मेरीटनुसार करण्यात येईल. तसेच कागदपत्रांची पडताळणी व मेडीकल चाचणी करुन निवड करण्यात येणार आहे.
AAI Bharti 2024 Salary
ज्युनियर एक्झिक्युटिव झालेल्या उमेदवारांना दरमहा रु.40,000/- ते 1,40,000/- एवढे वेतन व इतर भत्त्याचा लाभ होणार आहे.
AAI Bharti 2024 Important Dates
अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक | 02/04/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 01/04/2024 |
How to Apply AAI Bharti
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवरुनही अर्ज करता येऊ शकणार आहे. उमेवादवारांनी https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/88079/Index.html ह्या लिंकवर जाऊन प्राथमिक रजिस्ट्रेशन करावे व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी. सही, फोटो व इतर शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन फि भरुन अर्जाची प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |