
ICDS Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील एकुण 102 रिक्त पदांच्या भरती करीता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. तरी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी दिनांक 14/10/2024 पासुन ते 03/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
ICDS Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | महिला व बाल विकास विभाग |
पदाचे नाव | मुख्यसेविका गट-क |
एकूण पदसंख्या | 102 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 14/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 03/11/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.icds.gov.com |
ICDS Bharti 2024 Vacancy
महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क व संवर्गातील 102 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मुख्यसेविका / पर्यवेक्षिका | 102 |
Total | 102 |
ICDS Bharti 2024 Eligibility Criteria
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | मुख्यसेविका / पर्यवेक्षिका | कोणत्याही शाखेतील पदवी |
ICDS Bharti 2024 Fees
ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना रु.900/- शुल्क भरावे लागेल.
ICDS Bharti 2024 Age Limit
महिला व बालविकास विभागामध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 03/11/2024 रोजी 21 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Important Dates : ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक 14/10/2024 असून शेवट दिनांक 03/11/2024 पर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाईन परिक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
Selection process : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, गणित, बुध्दिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान एकुण 200 गुणांची बहुपर्यायी परिक्षा घेण्यात येईल. परिक्षेतील गुणांच्या मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
How to Apply : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://www.icds.gov.com ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
हे पण वाचा – महिला व बाल विकास विभागात 0236 जागांची भरती
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |