
NPCIL Bharti 2024 : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एक वर्षाच्या कालावधीसाठी एकुण 335 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10वी पास व आयटीआय पास असणाऱ्या उमेदवारांना ट्रेड अप्रेंटिस म्हणून संधी मिळणार आहे. तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येऊ शकणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 04/04/2024 पुर्वी अर्ज करावा लागेल.
NPCIL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवाराकडे इयत्ता 10 वी पास व फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर या सबंधित आयटीआय ट्रेड पास असणे आवश्यक आहे. एक वर्षाचा आयटीआय ट्रेड पास व दोन वर्षाचा आयटीआय ट्रेड पास असणाऱ्या उमेदवारांच्या मानधनामध्ये फरक असणार आहे.
NPCIL Bharti 2024 वयोमर्यादा
ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी 14 वर्षापेक्षा कमी नसावे तसेच 24 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आली असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
NPCIL Bharti 2024 अर्ज शुल्क
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
NPCIL Bharti 2024 वेतन
ज्या उमेदवारांनी एक वर्षाचा आयटीआय उत्तीर्ण केलेला अशा उमेदवांराना 7,700/- प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे तसेच ज्या उमेदवारांनी दोन वर्षाचा आयटीआय कोर्स केलेला आहे अशा उमेदवारांना दरमहा 8,855/- मानधन देण्यात येणार आहे.
NPCIL Bharti 2024 निवड प्रक्रिया
जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार अधिक्य यावरुन शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.
NPCIL Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी http://www.apprenticeship.gov.in/ या वेबसाईटवरुन स्वयं नोंदणी करुन NPCIL रावतभाटा राजस्थान च्या साईटवर जाहिरातीमध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन अप्रेंटिससाठी नोंदणी करावी. त्यानंतर https://www.npcilcareers.co.in ह्या साईटवरुन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही इतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड केल्यावर ऑनलाईन अर्ज सबमिट करुन प्रिंट करुन ठेवावा.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |