Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बाल विकास विभागात 0236 जागांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील सरळसेवा कोटयातील रिक्त असलेल्या गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शिक्षण पुर्ण करुन सरकारी नोकरीच्या शोधात असणा-या तरुण तरुणींसाठी ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून पात्रतेनुसार शेवट दिनांक 03 नोव्हेंबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Overview :

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग
पदाचे नावगट-क व गट-ड संवर्गातील पदे
एकूण पदसंख्या236
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीऑनलाईन परिक्षा
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याचा दिनांक14/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक03/11/2024
अधिकृत वेबसाइटhttps://www.wcdcommpune.com 
महिला व बाल विकास विभाग भरती 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy

महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत गट-क व गड-ड संवर्गातील विविध पदाच्या 236 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.संरक्षण अधिकारी, गट ब02
2.परिविक्षा अधिकारी, गट क72
3.लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
4.लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
5.वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क56
6.संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
7.वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
8.कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
9.स्वयंपाकी गट-ड06
Total236
महिला व बाल विकास विभाग भरती 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.संरक्षण अधिकारी, गट बसमाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी, 3 वर्षे अनुभव 
2.परिविक्षा अधिकारी, गट क  कोणत्याही शाखेतील पदवी
3.लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
4.लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5.वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क कोणत्याही शाखेतील पदवी
6.संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी 
7.वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी 
8.कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच 
9.स्वयंपाकी गट-ड10वी उत्तीर्ण 
महिला व बाल विकास विभाग भरती 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Fees

ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग उमेदवारांना रु.900/- शुल्क लागेल.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Age Limit

महिला व बालविकास विभागामध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 03/11/2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Last Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 14/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 03/11/2024 असणार आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Selection process

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

How to Apply Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://www.wcdcommpune.com ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.

महिला व बाल विकास विभाग भरती 2024

Leave a Comment