
ITBP Bharti 2024 : CRPF कायद्यांतर्गत भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 51 जागा भरावयाच्या असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज दि.20/07/2024 पासून ते शेवट दिनांक 18/08/2024 पर्यंत करता येईल.
ITBP Bharti 2024 Vacancy
ITBP तर्फे राबविण्यात येत असलेल्या या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही उमेदवार अर्ज करु शकतात. पदनिहाय संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल (Tailor) | 18 |
2 | कॉन्स्टेबल (Cobbler) | 33 |
एकूण | 51 |
ITBP Bharti 2024 Education Qualification
- Constable Tailor – पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
- Constable Cobbler – पदासाठी इ. 10वी उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
Age Limit
कॉन्स्टेबल पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 18/08/2024 रोजी 18 ते 25 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट असून SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
Fee
कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रुपये 100/- फि भरावी लागेल. SC/ST/ExSM उमेदवारांना फि लागू नाही.
ITBP Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 20/07/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 18/08/2024 |
ITBP Bharti 2024 Selection Process
ITBP कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांची उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच फिजिकल चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर मेरीटवर आधारीत कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.
Read Also : Central Railway Apprentice 2024 : मध्य रेल्वेत 2424 पदांवर भरती जाहिर
How to apply ITBP Bharti 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
- त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
- अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |