
SBI PO Bharti 2024 : देशातील अग्रणी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर PO पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण 1040 जागा असून या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव आवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून दिनांक 19/07/2024 पासून ते शेवट दिनांक 08/08/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याअगोदर कृपया मूळ जाहिरात वाचावी.
SBI PO Bharti 2024 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) | 02 |
2 | सेंट्रल रिसर्च टीम (Support) | 02 |
3 | प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) | 01 |
4 | प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) | 02 |
5 | रिलेशनशिप मॅनेजर | 273 |
6 | VP वेल्थ+ | 643 |
7 | रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) | 32 |
8 | रीजनल हेड | 06 |
9 | इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट | 30 |
10 | इन्वेस्टमेंट ऑफिसर | 49 |
एकूण | 1040 |
SBI PO Bharti 2024 Education Qualification
भारतीय स्टेट बँकेत PO पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे पात्रता असावी.
- पद क्र.1 : MBA/PGDM/PGDBM/CA/CFA व 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: पदवी/पदव्युत्तर पदवी (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics) व 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM व 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4: MBA/PGDM/PGDBM व 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: पदवीधर व 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: पदवीधर व 06 वर्षे अनुभव
- पद क्र.7: पदवीधर व 08 वर्षे अनुभव
- पद क्र.8: पदवीधर व 12 वर्षे अनुभव
- पद क्र.9: MBA/PGDM/PGDBM/CA/CFA, NISM 21A प्रमाणपत्र व 06 वर्षे अनुभव
- पद क्र.10: MBA/PGDM/PGDBM/CA/CFA , NISM 21A प्रमाणपत्र व 04 वर्षे अनुभव
SBI PO Bharti 2024 Age Limit
भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करणा-या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी पदानुसार खालीलप्रमाणे असावे.
- पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
- पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
- पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
- पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
- पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
- पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
- पद क्र.10: 28 ते 40 वर्षे
तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
SBI PO Bharti 2024 Fee
PO पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार असून General/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.750/- शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/OBC/PWD प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क लागू नाही.
SBI PO Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 19/07/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 08/08/2024 |
SBI PO Bharti 2024 Selection Process
PO पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची Shortlist तयार करण्यात येणार आहे. त्याआधारे उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असून मेरीटवर आधारे कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.
Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 पदासाठी भरती
How to Apply SBI PO Bharti 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
- फोटो, सही, डाव्या हाताराचा अंगठा, स्वहस्ताक्षरात लिहिलेले Declaration
- त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
- अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |