Central Railway Apprentice 2024 : मध्य रेल्वेत 2424 पदांवर भरती जाहिर

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Central Railway Apprentice 2024 | मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस पदाच्या एकुण 2424 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी इ.10 वी उत्तीर्ण व आयटीआय उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. सदरचा अप्रेंटिस कालावधी 12 महिण्याकरीता असेल. दिनांक 16/07/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 15/08/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. करीता उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत. (कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

Central Railway Apprentice 2024 Vacancies

पदाचे नावविभागपद संख्या
अप्रेंटिसमुंबई1594
भुसावळ418
पुणे192
नागपूर144
सोलापूर76
Total 2424

Central Railway Apprentice 2024 Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात16/07/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक15/08/2024

Central Railway Apprentice 2024 Eligibility

मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह इ.10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter /Painter/ Tailor/ Electrician/ Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/ Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance) पैकी आयटीआय उत्तीर्ण असावा.

Age Limit

अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी दिनांक 15 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट आहे.

Exam Fee

सर्वसाधारण/OBC या प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- फि भरावी लागेल तर SC/ST/PDW/EWS/महिला प्रवर्गासाठी फि नाही.

Central Railway Apprentice 2024 Salary

अप्रेंटिससाठी भरती होणाऱ्या उमेदवारांना रु.15,000/- प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

Central Railway Apprentice 2024 Selection Process

ह्या भरतीकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांची इ.10 वीचे गुण व ITI मधील गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार करुन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैदयकीय चाचणी करण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

How to Apply Central Railway Apprentice 2024

  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://rrccr.com/tradeapp/login ह्या वेबसाईटवर भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे.
  • रजिस्ट्रेशन करुन त्यामध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपुर्वक भरावी.
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे.
  • नंतर फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावे.
  • अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment